36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी जिजाऊच्या लेकी उतरल्या मैदानात!

मराठा आरक्षणासाठी जिजाऊच्या लेकी उतरल्या मैदानात!

टीम लय भारी 

मुंबई: मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता अखिल भारतीय मराठा महासंघ, महिला आघाडीच्या रणरागिणी पुढे सरसावल्या आहे. मराठा महासंघ, महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांची भेट घेतली. Chhagan Bhujbal meets maratha mahamorcha leaders

महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने मराठा समाजाची सध्याची हलाखीची परिस्थिती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समोर मांडल्या आहे. या वेळी शिष्टमंडळाने मराठा समाजाला ओबीसी गटातून आरक्षण मिळावे,असा मुद्दा मांडला आहे. यावेळी  मंत्री छगन भुजबळ व नाना पटोले यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले व या प्रश्नाची दुसरी बाजू सांगितली.

१७ टक्के ओबीसी आरक्षणात ४५० जाती असून सध्याच्या पन्नास टक्के आरक्षणात अनुसुचित जाती जमाती, ओबीसी व मराठे समाविष्ट केले तर उरलेल्या ५० टक्के खुल्या जागा या कोणासाठी राहतील, असा प्रश्नही भुजबळ यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी भव्य मूकमोर्चे काढून फायदा झाला नाही. न्यायालयाने मराठा आरक्षण देण्यास नकार दिल्यामुळे आता हा प्रश्न वेगळ्या पातळीवरून हाताळण्याचे महासंघाने ठरविले आहे. एकीकडे ५० टक्क्यांपुढील कोट्यातून आरक्षण मिळविण्यासाठी घटनादुरुस्ती, न्यायालयीन लढा आदी प्रयत्न सुरूच ठेवताना दुसरीकडे ५० टक्के मर्यादेतूनच ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठीही महासंघाने प्रयत्न सुरु केले आहेत. Chhagan Bhujbal meets maratha mahamorcha leaders

नाना पटोले यांनी सुद्धा अरक्षणा बाबतीत आपले विचार मांडत असताना भाजपा नेत्यांकडून आरक्षणाची कशी कोंडी केली जात आहे याचा पाढा वाचला व आरक्षण न मिळण्यासाठी भाजपा जबाबदार असल्याचे निक्षून सांगितले अशी माहिती या शिष्टमंडळाला दिली आहे.  या चर्चेच्या वेळी महागाई गगनाला भिडल्याने सर्व सामान्य माणसाला त्याची मोठ्या प्रमाणात झळ बसली असून त्या विषयावर सुद्धा केंद्र सरकारला जबाबदार धरले व महिला भगिनींनी या विषयावर सुद्धा एकत्र आले पाहिजे असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले . Chhagan Bhujbal meets maratha mahamorcha leaders

शिक्षण व नोकरीमध्ये समाजातील तरुणांना येणाऱ्या अडचणीची ओबीसी नेत्यांना कल्पना द्यावी अशी संकल्पना महासंघाचे अध्यक्ष ॲड शशिकांत पवार यांनी मांडली असून महासंघाची महिला आघाडी टप्प्या टप्प्याने महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेत्यांना भेटणार आहे. पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी जिजाऊच्या लेकी उतरल्या मैदानात!

हे सुद्धा वाचा: 

भाजपने स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करावी उगाच रडीचा डाव खेळू नये – छगन भुजबळ

Maharashtra Congress Chief Nana Patole Gave Strong Message, Says, ”Ban Rallies Of

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी