30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रवारकरी संप्रदाय युवा मंचाची मुख्यमंत्र्यांना विनंती, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे घातले...

वारकरी संप्रदाय युवा मंचाची मुख्यमंत्र्यांना विनंती, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे घातले साकडे

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे संपावर आहेत. एसटीचे महामंडळ शासनात विलीन करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपासंदर्भांत आता वारकरी संप्रदाय युवा मंचाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे साकडे घातले आहे. पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे (Warkari Sampraday Yuva Manch’s request to the CM).

कोरोना सारख्या काळात ज्या एसटी बसेस द्वारे सर्व संतांच्या पादुकांनी पंढरीच्या मार्गावर प्रवास केला. त्याच एसटी वर अनेक दिवस संप करण्याची वेळ आली हे दुर्देव आहे. सर्व सामान्यांच्या जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे एसटी बस आणि तिथे काम करणारे एसटी कर्मचारी. त्यामुळे राज्य शासनाने समन्व्य साधून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा

विमानात प्रवाशाची तब्येत बिघडली, केंद्रीय मंत्र्याने केले उपचार

Warkari Sampraday Yuva Manch's request to the CM
वारकरी संप्रदाय युवा मंचाची मुख्यमंत्र्यांना विनंती

तसेच संपूर्ण महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय या एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत कायम राहील. असे आश्वासनही या पत्रात करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने कोविड काळात केलेल्या कामाचे ही कौतुक या पत्रात करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी कोल्हापुरात राजकीय धुळवड

“Uddhav Thackeray Part-Time Chief Minister”: BJP’s Poll Dare To Shiv Sena

राज्य सरकारने कोविड काळात उत्तम कामगिरी करत लोकांच्या मनात घर केले आहे. सदर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील आपण अत्यंत संयमाने मार्गी लावाल. अशी अपेक्षा ही या पत्रात वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी