31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयराज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

टीम लय भारी

मुंबई :- गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईची लाईफ लाईन असलेली उपनगरीय रेल्वे सेवा ही सर्व सामन्यांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींनाच उपनगरीय रेल्वे सेवेची मुभा देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे (Letter written by Raj Thackeray to Uddhav Thackeray).  

पत्रात ते लिहिले आहे की, जवळजळ सर्वच कार्यालये ही सुरू आहेत. उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्यामुळे लोकांना बसने प्रवास करावा लागतो. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली. परंतु उपनगरीय रेल्वे सेवेला परवानगी न दिल्याने बसमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते. शिवाय अशा गर्दीत रोग पसरण्याचा धोका हा आहेच. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद याने काय साध्य होणार आहे? असा सवाल या पत्रातून विचारण्यात आला.

‘चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर’

Video : पुरात वेढलेल्या चिपळूण, खेडला वाचविण्यासाठी मदत यंत्रणा लागली कामाला : विजय वडेट्टीवार

कोरोनाची ही साथ इतक्या सहज जाणार नाही असे तत्ज्ञ सांगतात. त्यामुळे आपल्याला या साथी बरोबर राहण्याची सवय करून घ्यावी लागणार आणि त्याला अनुरूप असे धोरण आणि उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत. परंतु सरकारला टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडे काहीही सुचत नाही असा टोला त्यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना लगावला (In a letter to the Chief Minister, he said that the government does not suggest anything beyond lockouts and restrictions).

सरकारने निर्बंध शिथील करावेत आणि उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सामन्यांसाठी सुरू करावीत. असे न केल्यास उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आंदोलने सुरू करू असा इशारा राज यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना दिला.

Letter written by Raj Thackeray to Uddhav Thackeray
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे

अजितदादा हे जनतेच्या मनातील ‘दादा’ : दत्तात्रय भरणे

Raj Thackeray writes to CM Uddhav Thackeray: Resume local train services in Mumbai for general public, else will hold demonstration

ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत किमान त्यांना तरी उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी राज यांनी केली. त्याचबरोबर लसीकरण वाढवावे जेणेकरून करून अधिकाधिक लोकांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करता येईल असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी