29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयसिडकोच्या नियोजनावर फिरले पाणी; पालिकांचे दावे ठरले फोल

सिडकोच्या नियोजनावर फिरले पाणी; पालिकांचे दावे ठरले फोल

टीम लय भारी

नवी मुंबई : ‘सिडको नियोजनबध्द सिडको‘ ही सिडकोची ओळख आता धुळीला मिळाली आहे. नवी मुंबई, बेलापूर, उरण हे नियोजनबध्द शहर आहे. हा परिसर सिडकोच्या नियोजनबध्द बांधकामांसाठी प्रसिध्द आहे. मात्र दोन दिवसांच्या पावसाने सिडकोच्या नियोजनावर पाणी फिरले आहे. नवी मुंबई हे नियोजनबध्द शहर आहे. या ठिकाणी कोणत्याही समस्या येणार नाहीत असा दावा नवी मुंबई महानगर पालिकेने यापूर्वी अनेक वेळा केला आहे. मात्र याच नियोजनबध्द शहरामध्ये आज अनेक वाहने पाण्यात फसली आहेत.

त्यात कंटेनर सारख्या वाहनांचा समावेश असल्याने  वाहतूक कोंडी झाली. नवी मुंबई, उरण, बेलापूर ही उपनगरं सिडकोच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळयातील समस्यांना नवी मुंबई महानगरपालिके इतकेच सिडको देखील जबाबदार आहे. दोन दिवस मुंबई आणि नवी मुंबईमध्ये पावसाचे धुमशान सुरु आहे. संततधार पावसाचा आज दुसरा दिवस आहे. पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे.

तसेच मुंबई पालिकेच्या यावर्षी केलेल्या विकास कामांवर देखील पाणी फिरले आहे. दरवर्षी दादर पूर्वेकडील हिंदमाता परिसर पावसाळयात जलमय होतो. दुकानांमध्ये पाणी शिरते. हा परिसर मुख्यतः कपडयांच्या दुकानांसाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे दुकानदारांचे लाखोंनी नुकसान होते. यावर्षी मुंबई पालिकेने हिंदमाता परिसरात भूमीगत टाक्या बांधण्याचे काम केले. मात्र तरीही पाण्याचा निचरा झाला नाही. गुडघा भर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला. गाडया बंद पडल्या. मोठे मोठे पंप लावून पाण्याचा निचरा करावा लागला. महानगरपालिकेच्या कामावरचा नागरिकांचा विश्वास उडाला आहे.

हे सुध्दा वाचा:

फडणवीस आणि शहा यांच्यात नेमकं बिनसलंय काय ?‘या‘ देशातील प्रत्येक घरात असते बंदूक

VIDEO : नाना पटोले दिंडीत झाले सहभागी !

मुंबईची अक्षरशः तुंबई झाली… चित्रा वाघ बरसल्या; नेमका रोख कोणाकडे?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी