29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus चा अमेरिकेत उद्रेक : पंधरा दिवसांत 900 वरून 53 हजार रूग्णांची...

Coronavirus चा अमेरिकेत उद्रेक : पंधरा दिवसांत 900 वरून 53 हजार रूग्णांची वाढ

Coronavirus रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेडसावतोय सुरक्षा साधनांचा तुटवडा

Coronavirus मुळे अमेरिकेत आणीबाणी

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा ( Coronavirus ) राक्षसी अवतार जगभरात थैमान घालत आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला सुद्धा ‘कोरोना’ने ( Coronavirus ) घायकुतीला आणले आहे. आग फैलावत जावी तशा पद्धतीने ‘कोरोना’  अमेरिकेत पसरत चालला आहे. पंधवड्यापूर्वी अमेरिकेत ९०० कोरोनाबाधित रूग्ण आढळले होते. या ९०० जणांकडून संसर्ग झाल्याने सध्याच्या घडीला ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा ५३ हजारावर जाऊन ठेपला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

अमेरिकेमध्ये १५ फेब्रुवारी रोजी अवघे १२ रूग्ण होते. ती संख्या हळूहळू वाढत गेली. १० मार्च रोजी रूग्णांची संख्या ९४९ एवढी होती. १० मार्चनंतर मात्र भयानक वेगाने रूग्णांची संख्या वाढत गेली. अवघ्या तीनच दिवसांत म्हणजे १३ मार्च रोजी ती २१५७ एवढी झाली. १६ मार्च रोजी ती ४५०३ एवढी झाली. त्यानंतर ‘कोरोना’चा ( Coronavirus ) फैलाव आणखी झपाट्याने वाढला. १९ मार्च रोजी ही संख्या १३,४७४ वर जाऊन पोचली. २२ मार्च रोजी ही संख्या ३२,९७५ एवढी झाली. २३ मार्च रोजी तब्बल ४२,८८६ एवढी रूग्ण संख्या झाली. ही बातमी लिहित असताना ५२,९९६ ‘कोरोना’ग्रस्तांची ( Coronavirus ) संख्या होती. बातमी अपलोड करीत असताना ती ५३,६५५ एवढी झाली. साधारण मागील दोन तासांत अमेरिकेत जवळपास ६५० पेक्षा जास्त नवे रूग्ण आढळले.

Coronavirus in Itely
इटलीतील डॉक्टरांनाच ‘कोरोना’ झाला आहे.

जगातील सर्वाधिक बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेने ‘कोरोना’समोर अक्षरशः गुडघे टेकलेले दिसत आहे. वाढणारी ही संख्या नियंत्रणात आणण्यामध्ये अमेरिकेची अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. आतापर्यंत अवघे ३७० रूग्ण बरे होऊ शकले आहेत, तर मृतांची संख्या ६९८ एवढी आहे.

या अर्ध्या लाख ‘कोरोना’ग्रस्तांवर ( Coronavirus ) उपचार करण्यासाठी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही साधने अपुरी पडत आहेत. उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा साधने पुरेशी नाहीत. मास्क, गाऊन्स, डोळे अच्छादित करणारे आय गियर यांचा पुरवठा कमी आहे. ही साधने एकदा वापरल्यानंतर ती पुन्हा वापरायची नसतात. पण नवीन साधने येत नसल्याने तीच साधने पुन्हा वापरावी लागत आहेत. त्यामुळे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वैद्यकीय सेवा देणाऱ्या अनेक डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनाही झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा देणारे सगळे कर्मचारी व हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन ट्रम्प प्रशासनावर संतापले आहेत.

Coronavirus in UK
ब्रिटनमधील सगळी विमानतळे ओस पडली आहेत

सुरक्षा साधने तरी द्या म्हणून हे कर्मचारी काकुळतीने विनंती करीत आहेत. अमेरिकन मेडीकल असोसिएशन, अमेरिकन हॉस्पीटल असोसिएशन आणि अमेरिकन नर्सेस असोसिएशन या तिन्ही संघटनांनी एकत्रितपणे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिले. वैद्यकीय साधनांचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘डिफेन्स प्रॉडक्शन ॲक्ट १९५०’ त्वरीत लागू करा अशी मागणी या तिन्ही संघटनांनी केली आहे. हा कायदा लागू झाला तर वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढेल अशी या तिन्ही संघटनांची भावना आहे.

परंतु या तिन्ही संघटनांची मागणी ट्रम्प यांनी पूर्ण केलेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपण अन्य उपाययोजना करीत आहोत, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. परिस्थिती फारच बिकट झाली तर ‘डिफेन्स एक्ट’ लागू केला जाऊ शकतो. पण ती वेळ येणार नाही अशी ट्रम्प यांनी या तिन्ही संघटनांची समजूत घातली आहे.

Coronavirus Austrleya
सिडनीमधील रस्ते निर्मणूष्य झाले आहेत. तिथे पक्षांनी जागा घेतली आहे

अमेरिकेत सध्या १ लाख ७० हजार व्हेंटिलेटर्स आहेत. सध्या ही संख्या पुरेशी वाटत असली तरी ती कमी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्याने मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर्सची निर्मिती करणे शक्य नसल्याचे वैद्यकीय उपकरणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे. काही कंपन्यांनी व्हेंटिलेटर्सची उत्पादने वाढवायला सुरूवात केली आहे.

वैद्यकीय चाचण्यांवर मर्यादा

रूग्णालये व प्रयोगशाळांमध्ये ‘कोरोना’च्या ( Coronavirus ) चाचण्या केल्या जात आहेत. पण त्यावरही मोठी मर्यादा येऊ लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त चाचण्या कराव्या लागत आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेत दररोज २,२०० चाचण्या केल्या जात आहेत. पण ही संख्या ५००० पर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या विविध प्रांतातील प्रयोगशाळांवर चाचण्यांचा असाच भार वाढलेला आहे.

Coronavirus usa
अमेरिकेतील प्रयोगशाळांना मर्यादेपेक्षा जास्त ‘कोरोना’ चाचण्या कराव्या लागत आहेत

प्रत्येक तीन दिवसानंतर रूग्णांच्या संख्येत दूपटीने वाढ

‘कोरोना’चा ( Coronavirus ) फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेतील जास्त लोकसंख्या असलेल्या भागात प्रत्येक तीन दिवसानंतर रूग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे, असे न्यूयॉर्कचे गव्हर्नर ॲण्ड्र्यू क्युमो यांनी सांगितले. एकट्या न्यूयॉर्क शहरात १४ हजार पेक्षा जास्त ‘कोरोना’ बाधित आढळले आहेत. संसर्ग अतिशय वेगाने वाढत चालला आहे. त्याचा वेग आम्ही कमी करू शकत नसल्याची हतबलता क्युमो यांनी व्यक्त केली आहे.

पहिला बाधित २० जानेवारीला आढळला होता

अमेरिकेत पहिला ‘कोरोना’बाधित ( Coronavirus ) २० जानेवारीला आढळला होता. वॉशिंग्टनमधील ३५ वर्षीय हा तरूण चीनच्या वुहान प्रांतात जाऊन आला होता.

अमेरिकेतही ‘लॉकडाऊन’

अमेरिकेनेही ‘लॉकडाऊन’ केले आहे. अन्न धान्य, गॅस पुरवठा करणारी कार्यालये व औषध दुकानांमध्ये जाण्यासाठीच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. हॉटेल्सना घरपोच खाद्य पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. दोन लोकांमध्ये किमान ६ फुटाचे अंतर ठेवण्याची सुचना केली आहे. विनाकारण कुणी घराबाहेर पडला तर तिथे मोठा आर्थिक दंड आकारला जात आहे. शिवाय पोलीस कारवाई सुद्धा केली जात आहे. अमेरिकेतील ४६ राज्यांमधील शाळा बंद केल्या आहेत. अमेरिकतील ‘काँग्रेस’ सभागृहाने एक विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार ‘कोरोना’मुळे बाधित झालेल्यांना मदत दिली जाणार आहे.

जगभरातील ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या सव्वा चार लाख

तब्बल १९७ देशांमध्ये ‘कोरोना’ने ( Coronavirus ) हातपाय पसरले आहेत. आतापर्यंत ४ लाख २२ हजार लोकांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. त्यापैकी १९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. १ लाख ८ हजार जण आतापर्यंत बरे झाले आहेत. २ लाख ९१ हजार ५४० जण अद्याप उपचार घेत आहेत. त्यातील १२ हजार ९८१ जणांची प्रकृती गंभीर आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

विविध देशांतील ‘कोरोना’बाधितांची आकडेवारी ( कंसात मृत्यू )

चीन – ८१,१७१ (३,२७७)

इटली – ६९,१७६ (६,८२०)

अमेरिका – ५३,२८७ (६८९)

स्पेन – ३९,८८५ (२,८०८)

जर्मनी – ३२,९८६ (१५७)

इराण – २४,८११ (१९३४)

फ्रान्स – २२,३०४ (१,१००)

स्वित्झर्लंड – ९,८७७ (१२२)

दक्षिण कोरिया – ९,०३७ (१२०)

ब्रिटन – ८,०७७ (४२२)

नेदरलॅंड – ५,५६० (२७६)

ऑस्ट्रिया – ५,२८३ (२८)

बेल्जियम – ४,२६९ (१२२)

नॉर्वे – २,८६३ (१२)

कॅनडा – २,७९२ (२६)

पोर्तूगाल – २,३६२ (३३)

स्वीडन – २,२८६ (३६)

ब्राझिल – २,२४७ (४६)

ऑस्ट्रेलिया – २,१४४ (३)

इस्राईल – १,९३० (३)

तुर्की – १,८७२ (४४)

मलेशिया – १६२४ (१६)

डेन्मार्क – १,५९१ (३२)

पाकिस्तान – ९७२ (७)

भारत – ५३६ (१०)

हे सुद्धा वाचा

CoronavirusLockdown : पंतप्रधानांची मोठी घोषणा, देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन

CurfewInIndia : आरोग्यमंत्र्यांनी जनतेला लिहिले विनंतीपत्र

Corona पसरविणाऱ्या वटवाघळाला समजून घ्या ( डॉ. महेश गायकवाड )

US health official says coronavirus testing system is ‘failing’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी