28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटआशिया कप २०२३: दुबळ्या नेपाळला बाबर आझमने झोडले !

आशिया कप २०२३: दुबळ्या नेपाळला बाबर आझमने झोडले !

आशिया चषक स्पर्धेची सुरुवात दणक्यात झाली असून बुधवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्यात पाकिस्तानने नेपाळवर दणदणीत विजय मिळवला आहे. कर्णधार बाबर आझमच्या शानदार 151 धावांच्या खेळीने तर इफ्तिखार अहमदच्या पहिल्यावहिल्या एकदिवसीय शतकी खेळीने नेपाळचा 238 धावांनी पराभव केला आहे. कर्णधार बाबरने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सलामीवीर फखर जमान आणि इमाम-उल-हक यांना मोठी कामगिरी करता आली नाही. फखर जमान 14 धावा करून माघारी परतला तर इमाम-उल-हक याला 5 धावा करता आल्या. त्यानंतर कर्णधार बाबर आणि भरवशयचा खेळाडू मोहम्मद रिझवान या अनुभवी खेळाडूंनी पाकिस्तानचा डाव सावरला. रिझवानने 50 चेंडूंत 6 चौकारांसह 44 धावा केल्या. कर्णधार बाबरसह त्याने 106 चेंडूत 86 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर, बाबर आझमने फलंदाजीला आलेल्या इफ्तिखार अहमदसोबत पाचव्या विकेटसाठी 131 चेंडूंत 214 धावांची विक्रमी भागीदारी केली. बाबरने 131 चेंडूंत 14 चौकार व 2 षटकारांसह 151 धावा केल्या, तर इफ्तिखारने 71 चेंडूंत 11 चौकार व 4 षटकारांसह 109 धावांची नाबाद खेळी केली. पाकिस्तानने 50 षटकांत 6 बाद 342 धावा केल्या. नेपाळच्या सोमपाल कामीने 85 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अपेक्षित सुरूवात करत नेपाळच्या फलंदाजांना नाकी नऊ आणले. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने पहिल्या षटकात 2 विकेट्स घेऊन नेपाळला अडचणीत आणले. शाहिन आफ्रिदीला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. नेपाळच्या सोमपाल कामी व आरिफ शेख यांनी अर्धशतकी भागीदारी करून नेपाळच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण 15 व्या षटकात हॅरिस रौफने ही भागीदारी तोडली. रौफने आरिफ शेखला 26 धावांवर असताना क्लीन बोल्ड केले. त्यानंतर लगेचच, पुढच्या षटकात दुसरा सेट फलंदाज कामीला हॅरिसने 28 धावांवर असताना बाद केले.

हे ही वाचा

आशिया चषक २०२३: पाकिस्तानबद्दल हे काय म्हणाला अश्विन?

आशिया चषक २०२३: राहूल द्रविडने फोडली मोठी बातमी!

ब्राझिलियन स्टार फुटबॉलर नेमार येणार भारतात

त्यानंतर, शादाब खान व मोहम्मद नवाज यांनी उर्वरित नेपाळच्या खेळाडूंचा समाचार घेत नेपाळचा डाव 104 धावांत गुंडाळला. पाकिस्तानने 238 धावांनी हा सामना जिंकला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. बाबरने सामन्यानंतर सांगितले की, “आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत नेपाळवर दणदणीत विजय मिळाल्याने शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी त्यांचा आत्मविश्वास वाढेल.”

पाकिस्तानने अ गटातील सामन्यात नेपाळचा पराभव करून आशिया चषकात विजयी सुरुवात केली. आता 2 सप्टेंबरला बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी