33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रGoogle च्या जगभरातील १२,००० कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड

Google च्या जगभरातील १२,००० कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड

जागतिक आर्थिक मंदीमुळे गूगलच्या जगभरातील १२,००० कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा गूगलची मातृकंपनी 'अल्फाबेट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी केली.

जगभरातील कंपन्यांमधील कर्मचारी कपात चालूच आहे. गुगल (Google) ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट (Alphabet) ने १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून माहिती दिली आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणारी ॲमेझॉन, फेसबुकनंतर गुगल ही सर्वांत मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे.

पिचाई यांनी ई- मेलमध्ये म्हटले आहे की, “मला एक दुःखद गूगल बातमी सांगायची आहे. आम्ही आमचे कार्यबळ सुमारे १२,००० ने कमी करणार आहोत. एकंदर कामकाजाचा कठोरपणे आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.”

नोकरकपातीचा फटका बसणाऱ्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना आम्ही स्वतंत्र ई-मेल पाठवला आहे. मात्र, स्थानिक कामगार कायदे आणि कार्यपद्धतींमुळे अन्य देशांमध्ये कर्मचारी कपातीमुळे गूगलच्या अभियांत्रिकी, उत्पादन आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नोकरकपात जगभरातील असली तरी कंपनीच्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सर्वांत आधी जाणार आहेत.

“गेल्या दोन वर्षांत आम्ही नाट्यपूर्णवाढीचा काळ पाहिला. या वाढीची जुळवाजुळव करण्यासाठी आणि तिला वेग देण्यासाठी, आम्ही आज ज्या आर्थिक वास्तवाला तोंड देत आहोत, त्यापेक्षा वेगळ्या आर्थिक वास्तवाला स्वीकारले होते, ” असे पिचाई यांनी मेलमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : मायक्रोसॉफ्टसुद्धा १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत

’या‘ कंपन्यांनी उचलले कामगार कपातीचे पाऊल

मनापासून खेद वाटतो : पिचाई
नोकरकपातीबद्दल मला मनापासून खेद वाटतो. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या जीवनावर परिणाम होईल, हे वास्तव माझ्यासाठी अधिक त्रासदायक आहे. आम्ही घेतलेल्या या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो, असे पिचाई यांनी म्हटले आहे. कपातप्रक्रियेस अधिक वेळही लागेल, असेही पिचाई यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान कंपनीनेही १०,००० कर्मचारी कपात केली होती. ॲमेझॉननेही १८,००० तर फेसबुकने ११,००० कर्मचारी कपातीची घोषणा केली.

मोठ्या कंपन्या, मोठी कपात
ॲमेझॉन : १८,०००
फेसबुक : ११,०००
गूगल : १२,०००
मायक्रोसॉफ्ट : १०,०००

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी