29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्रिकेटरोहित शर्माच्या एका षटकाराने विश्वविक्रम

रोहित शर्माच्या एका षटकाराने विश्वविक्रम

देशात आयसीसी वर्ल्डकप (ICC Worldcup) अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक दिवसांपासून सेमी फायनलमध्ये कोण प्रवेश करणार याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. अनेकांना टीम इंडिया आणि पाकिस्तान अंतिम सामना खेळतील असे वाटत होते. मात्र पाकिस्तान संघाचा पराभव झाल्याने प्रेक्षकांच्या आणि पाकिस्तानच्या आशा नाहीशा झाल्या आहेत. तर या व्यतिरीक्त आता पहिला सेमी फायनलचा सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India Vs Newzealand) यांच्यात सुरू आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू असून टीम इंडियाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये एकाही सामन्यात पराभव झाला नाही. तर सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. अशातच आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) रेकॉर्ड देखील केला आहे.

टीम इंडियात अनेकांनी अपेक्षेहून अधिक चांगली कमागिरी केली. तर काही खेळाडूंनी आपल्या नावे विश्वविक्रम केले आहेत. काही दिवसांआधी विराट कोहलीने बांगलादेशविरूद्ध शतक ठोकत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची बरोबरी  केली आहे. तर आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विश्वविक्रम केला आहे. वेस्ट इंडिजचा उंच आणि तडाखेबद्ध माजी खेळाडू ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. (१५ नोव्हेंबर) सुरू असलेल्या न्यझीलंडविरोधात खेळत असताना सुरूवातीला शुभमन आणि रोहित फलंदाजीसाठी आले. यावेळी रोहित शर्माने सुरूवातीला गोलंदाजांना झोडपून काढले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)


हे ही वाचा

‘हरभजन सिंहला धर्मपरिवर्तन करायचे होते’; पाकिस्तानी माजी क्रिकेटरचे वक्तव्य

ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे अपशब्द

भाऊबीज म्हणजे बहीण-भावातील नात्याचा गोडवा

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट टिम इंडियाच्या डावातील पाचवी ओव्हर टाकण्याठी सज्ज झाला. या ओव्हरदरम्यान रोहितने सिक्स खेचत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज म्हणून रोहित शर्माचा विश्वविक्रम झाला आहे. गेलने २०१५ सालात २६ षटकार ठोकले होते. तर आता रोहित शर्माने २७ वा षटकार मारत विश्वविक्रम केला. जसजसा वर्ल्डकप अंतिम टप्प्यात येतोय. तशी वर्ल्डकपमधील रंजकता अधिक वाढू लागली आहे.

टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन – केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी