30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरक्रिकेटभारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दाखवले आसमान; कसोटी सामन्यात 1-0 आघाडी

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दाखवले आसमान; कसोटी सामन्यात 1-0 आघाडी

नागपुरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) पहिल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दारुन पराभर केला. भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्याच डावात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 223 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दूसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाला ९१ धावांमध्येच आसमान दाखवत भारतीय संघाने दणदणीत विजयाला गवसणी घातली. (IND vs Aus India’s first innings win in India Australia Test match)

पहिल्या डावात भारतीय संघाने ऑस्ट्रेलीयाचे सर्व खेळाडू बाद करत त्यांचा डाव 177 धावांमध्ये गुंडाळला, त्यानंतर भारतीय संघाने 400 धावा ठोकत ऑस्ट्रेलियासमोर 223 धावांची आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ ९१ धावांमध्येच ढेपाळला. आणि हा सामना भारतीय संघाने खिशात घातला.

हे सुद्धा वाचा

स्टीवन स्पीलबर्ग एस.एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’ चित्रपटावर फिदा!

पथविक्रेत्यांना ‘मैं भी डिजिटल 4.0’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

‘बीबीसी’ची जिहादी ब्राईड शमीमा बेगम पुन्हा वादात ; ब्रिटनवासियांचा कडाडून विरोध

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियायाचा गोलंदाज टॉड मर्फी याने पदार्पणातच भारतीय संघातील सात जणांना तंबूत पाठवले. मात्र भारतीय फलंदाजांनी धावांचे डोंगर रचत ऑस्ट्रेलियासमोर कडवे आव्हान उभे केले. तसेच भारतीय संघातील गोलंदाजांनी सुद्धा जोरदार विकेट्स काढल्या. रवींद्र जाडेजा याने 5 आणि रविचंद्रन अश्विनने 3 असे दोघांनी 8 बळी घेतले. तर सिराज याने ओक आणि शमीने एक बळी घेतला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी