33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeक्रिकेटIND vs NZ 3rd ODI : भारतीय संघाची नंबर वनकडे वाटचाल; शुभमन,...

IND vs NZ 3rd ODI : भारतीय संघाची नंबर वनकडे वाटचाल; शुभमन, रोहीत शर्मा बाद, दोघांनीही झळकवले शतक

इंदूर येथील होळकर स्टेडीयमवर आज (मंगळवार दि. 24) (IND vs NZ 3rd ODI) भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेतील अखेरचा सामना होत आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. आजच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिकंत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला असून कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीला आल्यानंतर शुभमन गिलने (Shubman Gill) यांने 112 धावा करुन बाद झाला. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) 101 धावा करुन तो बाद झाला.  (IND vs NZ 3rd ODI : Indian team moves to number one)

आजच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिकंत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला असून कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीला आल्यानंतर शुभमन गिलने याने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर त्यापाठोपाठ रोहित शर्माने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने एका षटकारासह 50 धावा पूर्ण केल्या. त्यांनतर दोघांनी आक्रमक खेळीला सुरूवात केली.

17 व्या शटकानंतर भारतीय संघाचा स्कोर शुन्य बाद 147 होता. 25 व्या षटकात शुभमन आणि रोहीतने 205 धावांची भागिदारी केली. तसेच दोन्ही खेळाडूंनी आपली शतकी खेळी देखील केली. त्यानंतर मात्र भारतीय संघाला पहिला झटका बसला रोहीत शर्मा क्लिन बोल्ड झाला. यावेळी भारतीय संघाचा स्कोर 212 धावा एक बाद असा होता. त्यापाठोपाठ थोड्याच वेळात शुभमन गिल देखील बाद झाला. यावेळी भारताचा स्कोर 28 षटके 230 धावा आणि दोन बाद असा होता. या सामन्यात शुभमन याने 112 धावा केल्या. तर रोहीत शर्मा याने तब्बल 1100 दिवसांनंतर आपले शतकी खेळी केली.
सध्या दोन विकेट नंतर भारतीय संघाच्या रन रेटवर देखील थोडा परिनाम झाला असून 33 षटकानंतर भारतीय संघाने 260 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि इशान किशन हे दोघे मैदानात आहेत.

आज भारतीय संघ न्यूझीलंडला तिसऱ्या सामन्यात देखील पराभूत करण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास भारतीय संघ आयसीसी एकदीवसीय संघांच्या क्रमवारीमधअये नंबर वनवर होणार आहे. इंदूरचे होळकर स्टेडियम भारतीय संघासाठी या आधी तसे लकी ठरलेले आहे. भारतीय संघाने या स्टेडियमवर झालेले सर्व सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघाने इंग्लड, वेस्टइंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेच्या संघांचा पराभव केला आहे. आज देखील भारतीय संघाने फंलदाजी करताना आपली जोरदार खेळी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका जिकंल्यास एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीमध्ये भारतीय संघ अव्वल ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे गुदमरली मुंबई; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

म्हाडा: घराची 50 टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ द्या; बाळकुम प्रकल्पातील लाभार्थ्यांची मागणी

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदिप यादव, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.

असा आहे न्युझीलंडचा संघ

डेवन कॉन्वे, फिन ऐलेन, हेनरी निकल्स, डेरिस मिचेल, टॉम लेखम (कर्णधार) ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सॅँटनर, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेयर टिकसन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी