27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeक्रिकेटIND vs SL 1st T20 दिपक हुड्डा आणि अक्षर पटेलची दमदार खेळी

IND vs SL 1st T20 दिपक हुड्डा आणि अक्षर पटेलची दमदार खेळी

भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० (IND vs SL 1st T20) मालिका मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिकंत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्यण घेत डावाला सुरूवात केली. भारताचा अष्टपैली खेळाडून हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात भारतीय संघ सामना खेळत असून विराट कोहली, केएल राहूल, रोहीत शर्मा मात्र या सामन्यात भारतीय संघात सहभागी नाही. भारतीय संघाची सुरुवातीपासूनच सुमार कामगिरी सुरू होती, एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना इशान किशन याने काही प्रमाणात संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नंतर कर्णधार हार्दिक पंड्या देखील अवघ्या २९ धावा काढून बाद झाला. भारतीय संघ कोलमडला असताना दिपक हु्ड्डा (Deepak Hooda)आणि अक्षर पटेल  (Axar Patel) या जोडीने संघाला सावरले.

भारताचा सलामीवीर फंलदाज इशान किशन याने पहिल्याच षटकात १६ धावा घेत श्रीलंकेच्या कसून राजीता याला चोपले, पहिल्या षटकात इशानने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. मात्र पॉवर प्लेच्या तिसऱ्या षटकात श्रीलंकेचा गोलंदाज किक्षाणा याने शुभमन गिल याला अवघ्या सात धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवची खेळी देखील फसली आणि सुर्यकुमार देखील अवघ्या ७ धावांवर बाद झाला. भारतीय संघाची पडझड सुरू असलताना संजू सॅमसन देखील मैदानात चमक दाखवू शकला नाही तो देखील 5 धावा करून बाद झाला.

हे सुद्धा वाचा

विश्व मराठी संमेलनात विदर्भाला डावलले; थेट शिंदे-फडणवीस यांच्याकडे तक्रार!

तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने दिली धडक; एक विद्यार्थिनी कोमात

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; अजित पवार यांचे खास ते देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू साथीदार!

संजू सॅमसन नंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरला इशान किशन आणि हार्दिक पांड्या भारतीय संघाला सावरण्याच्या प्रयत्नात होते. सामन्याच्या ११ व्या षटकात भारतीय संघाने चार गडी बाद ७७ धावा रचल्या मात्र श्रीलंकेचा गोलंदाज हसलंगा याने इशान किशन याला ३७ धावांमध्ये बाद केले. तर हार्दिक पंड्या देखी २७ चेंडूमध्ये २९ धावा काढून बाद झाला.
भारतीय संघाची मोठी पडझड चालू असतानाच दिपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी दमदार खेळी करत संघाला सावरले. दिपक हूड्डा ने २३ चेंडूत ४१ धावा काढल्या तर अक्षर पटेलने २० चेंडूत ३१ धावा आपल्या खात्यात जमा केल्या. या दोघांनी मिळून श्रीलंकेसमोर १६२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी