27 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeराजकीयशरद पवार म्हणाले, माझ्यासमोर संभाजी महाराजांबद्दल दोन पद्धतींचे लिखाण

शरद पवार म्हणाले, माझ्यासमोर संभाजी महाराजांबद्दल दोन पद्धतींचे लिखाण

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे विधान केले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्या विरोधात राज्यभरात जोरदार आंदोलन छेडले आहे. अजित पवार यांच्या विधानानंतर राज्यभरातून मत मंतांतरे होऊ लागली आहेत. राष्ट्रवादीचे अनेकनेते अजित पवार यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यातच आता पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील अजित पवार (Ajit Pawar)यांच्या विधानावर प्रतिक्रीया दिली आहे. (Sharad Pawar’s reaction to Ajit Pawar’s statement on Sambhaji Maharaj)

संभाजी महाराजांसदर्भातील जे लिखान आहे, त्यात माझ्या समोर त्यांच्याबदद्ल दोन पद्धतीचे लिखान आहे. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्याकाळचे प्रमुख नेते त्यांनी काही लिहीले आहे, तसेच सावरकरांनी काही लिहीले आहे. त्या दोघांनी संभाजी महाराजांबद्दल लिहिलेले आहे ते कोणालाही पसंत पडणार नाही. पण ते कधीकाळी लिहीलेलं होतं. ते आता कारण नसताना उकरुन काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात अर्थ नाही. म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही फक्त आठवण करुन देऊ इच्छित. आता दुसरा प्रश्न स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर यासंबंधीचा आहे. आता ज्यांना संभाजी महाराजांची स्वराज्य रक्षक म्हणून आठवण होत असेल तर त्यात काही चुकीचे नाही. तर कोणी धर्मवीर म्हणून उल्लेख करत असतील आणि धर्माच्या अॅँगलने त्यासंबंधी काही बोलत असेल तर त्याला देखील माझी तक्रार नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे. त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना धर्मवीर म्हणा अथवा धर्मरक्षक म्हणा त्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. ज्याला जे हवं आहे तो ते करु शकतो.

यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले, मला काळजी एकच आहे की, धर्मरक्षक यासंबंधीचा उल्लेख केला नाही याच्याबद्दल काही घटकांची जी तक्रार आहे त्याच्याबद्दल मला दुसरी एक काळजी अशी वाटते की, मी कधी ठाण्याला जातो त्यावेळेला धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावे येतात. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांचे ठाण्यामधील एकेकाळचे त्या नेत्यांचा धर्मवीर असा उल्लेख केला जातो. अनेक सरकारी जाहीरातींवर देखील त्यांचा उल्लेख केला जातो. माझी काही त्याबद्दल तक्रार नाही. म्हणून धर्मवीर काय धर्मरक्षक काय त्या व्यक्तीला संभाजी महाराजांबद्लची आस्था आहे, आणि आस्थेच्या पाठीमागचा जो विचार आहे त्या विचारातून ती अस्था असेल तर त्यासाठी वाद करण्याचे कारण नाही, धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा.

हे सुद्धा वाचा

IND vs SL 1st T20 दिपक हुड्डा आणि अक्षर पटेलची दमदार खेळी

विश्व मराठी संमेलनात विदर्भाला डावलले; थेट शिंदे-फडणवीस यांच्याकडे तक्रार!

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; अजित पवार यांचे खास ते देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू साथीदार!

पवार पुढे म्हणाले, शिवछत्रपती गेल्यानंतर या राज्यावर हल्ले होत असताना स्वत:च्या भवितव्याचा विचार न करता राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्यांनी एक महत्त्वाचे काम केले. त्याचीही नोंद आपण घेतली तर त्यात देखील काही चुकीचे नाही. त्यामुळे यावरुन वाद करण्याचे काही कारण नाही.

 

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी