29 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeक्रिकेटभारत आणि श्रीलंका सामन्यापूर्वीच भारताच्या डोकेदुखीत वाढ

भारत आणि श्रीलंका सामन्यापूर्वीच भारताच्या डोकेदुखीत वाढ

देशात आयसीसी क्रिकेटचे वारे वाहत आहेत. टीम इंडियासह जगभरातील क्रिकेट चाहते, या विश्वचषकाचा मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. या विश्वचषकात टीम इंडियाने 6 सामने खेळले असून 6 सामन्यात एक हाती विजय मिळवला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान या संघांविरूद्ध भारताचे सामने झाले आहेत. आज (2 नोव्हेंबर) टीम इंडियाची गाठ श्रीलंकेशी होणार आहे. मात्र या सामन्याआधीच टीम इंडियाला आपले अव्वल स्थान कमावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

दरम्यान, टीम इंडियासोबत झालेल्या सामन्यांपैकी सर्व सामने टीम इंडियाने जिंकले असले तरीही टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉइंट्स टेबलच्या दृष्टिकोनातून टीम इंडिया अव्वल होती, मात्र टीम इंडिया संघ आता पॉइंट्स टेबलवरून घसरला आहे. यामुळे टीम इंडियाला श्रीलंकेसोबत खेळताना अधिक धावसंख्येच्या दृष्टीने आपली कामगिरी करावी लागणार आहे. तर श्रीलंकेला कमी धावसंख्येवर बाद करावे लागेल. तेव्हा कुठे तरी टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर येऊन पोहचू शकते. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असू शकते. हे आव्हान टीम इंडिया कसे पेलू शकेल, हे पाहणे उत्कांठावर्धक असेल.

दरम्यान, इंडिया आणि श्रीलंका या सामन्यात टीम इंडियाला अधिक रनरेटने चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तेव्हा कुठे तरी भारत संघ हा पॉइंट्स टेबलच्या दृष्टिकोनातून पहिल्या स्थानावर विराजमान होईल. आतापर्यंत 6 सामने खेळले असून टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेसोबत एकही सामना झाला नाही. यामुळे द.अफ्रिका आणि टीम इंडिया या दोन्ही संघांची रणनीती कशी असेल याबाबत अजूनही अंदाज लावता येत नाही.

हे ही वाचा

विजयाची ‘सप्तपदी’ आणि कोहलीच्या रेकॉर्डची आस

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या तयारीला लागा

धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनता दरबारात जनतेचे प्रश्न सुटतात फटाफट

टीम इंडियासमोर द. आफ्रिकेचे आव्हान

टीम इंडिया विश्वचषकात चांगली कामगिरी करत असला तरीही द. आफ्रिका हा देखील तुल्यबळ संघ आहे. यामुळे टीम इंडियाला द.आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. या दोन्ही संघात सुरू असलेल्या विश्वचषकात एकही सामना झाला नाही. यामुळं हे दोन्ही संघांपैकी नेमका कोणता संघ एकमेकांवर भारी पडेल हे टीम इंडिया आणि द. आफ्रिका सामन्यावेळी कळेल. मात्र पॉइंट्स टेबलवर अव्वल येण्यासाठी आज टीम इंडियाची श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात परीक्षा आहे. आणि ही परीक्षा टीम इंडिया कशी पास होईल हे थोड्याच वेळात कळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी