28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेटमार्शच्या 'त्या' कृत्यावर शमी भडकला

मार्शच्या ‘त्या’ कृत्यावर शमी भडकला

आयसीसी वर्ल्डकप २०२३ अनेक कारणांसाठी गाजला आहे. अनेक वाद या वर्ल्डकपमध्ये झाले आहेत. तर काही सुखद धक्के देखील या वर्ल्डकपने दिले आहेत. यंदाचा वर्ल्डकप हा टीम इंडिया जिंकेल अशी चर्चा होती. मात्र एकूण १० सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असून अंतिम सामन्यातच टीम इंडियाला पराभवाच्या सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाची गोलंदाजी पाहता अनेकांना वाटले की इंडियासह फिक्सिंग होत आहे, मात्र यावेळी इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीने हा काही गल्ली क्रिकेट आहे का? असा सवाल विचारला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मिचेल मार्शने वर्ल्डकप ट्रॅफीवर पाय ठेवल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर पुन्हा एकदा शमी संतापला आहे.

काय म्हणाला शमी

मिचेल मार्शने वर्ल्डकपचा सेमी फायनल सामना जिंकल्यानंतर ट्रॅाफीवर पाय ठेवले होते. याची चर्चा देशभर सुरू होती. माध्यमांवर हे फोटो व्हायरल होत होते. मिचेल मार्शचा हा माज असावा का? असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर अनेक नेटकऱ्यांनी मार्शवर संताप व्यक्त केला आहे. यावर शमीने देखील राग व्यक्त केला असून मार्शलच्या कृत्यावर मोठे वक्तव्य केले आहे. अमरोहा येथील शमीच्या घरी पत्रकार आले असता शमीला मार्शच्या कृत्याबाबत प्रश्न विचारला यावर शमी उत्तरला ही ट्रॉफी जिंकण्यासाठी जगभरातील देश झगडत होते आणि जी ट्रॉफी त्यांना डोक्यावर ठेवायची हेती, त्यावर असे पाय पसरून बसला आहात, हे खरोखरच दु:खदायक होते, अशी भावना शमीने वक्त केली आहे.

हे ही वाचा

ठाण्यात ‘या’ दिवशी होणार ‘सत्यशोधक दिंडी’चे आयोजन

‘भुजबळांना भाजपमध्ये पलटी मारायची आहे’; जरांगे-पाटलांचं राजकीय वक्तव्य

किडनी ७५ हजार, लिव्हर ९० हजार, डोळे २५ हजार; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विक्रीची वेळ

शमीला विश्वचषकासाठी सुरूवातील खेळण्याची संधी मिळाली नाही. इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने  विश्वचषकातून बाहेर बसावे लागले होते. त्याऐवजी मोहम्मद शमीला खेळवण्यात आले. शमीने संधीचे सोने केले असून  विश्वचषकाच्या सात सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी