34 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeराजकीयअतुल सावेंच्या प्रयत्नांना यश; जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण मागे

अतुल सावेंच्या प्रयत्नांना यश; जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण मागे

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आणि धनगर आरक्षणावरून आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. तर सभा देखील घेतल्या जात आहेत. यामाध्यमातून आरक्षण मिळवता येईल असा विश्वास आंदोलकांचा आहे. मात्र सरकार यावर कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगेंनी आंदोलन करत उपोषण केलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यूस पाजून उपोषण मागे घेण्यासाठी सांगितलं. तर यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन न्यायाधीश पाठवले होते. याच जालना जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात धनगर आरक्षणासाठी पाठपुरावा व्हावा यासाठी उपोषण केलं आहे. हे उपोषण आता मागे घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावेंना यश आले आहे.

जालना जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले.  (२५ नोव्हेंबर) दिवशी अतुल सावे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी मंत्री महोदय यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी ज्यूस घेत आपले आमरण उपोषण सोडले. यावेळी राज्याचे मंत्री श्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा

मार्शच्या ‘त्या’ कृत्यावर शमी भडकला

‘भुजबळांना भाजपमध्ये पलटी मारायची आहे’; जरांगे-पाटलांचं राजकीय वक्तव्य

ठाण्यात ‘या’ दिवशी होणार ‘सत्यशोधक दिंडी’चे आयोजन

गेली २१ दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू होते. धनगर आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करता यावी, यासाठी अनेकांनी आंदोलन केलं. तर जामखेडच्या आहिल्यादेवी पुतळ्याजवळ भगवान भोजनेंनी उपोषण केलं. हे उपोषण आता मागे घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावेंना (२५ नोव्हेंबर) दिवशी यश आले आहे. सावे यांनी उपोषणास्थळी जाऊन भेट दिली आहे. लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन आरक्षण आणि इतर विषयावर चर्चा करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिले.

गेली अनेक वर्षांपासून मराठा आणि धनगर आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील व्हायचे आहे. तर ओबीसी समाज यासाठी विरोध करत आहे. तर एसटी प्रवर्गात सामावून घेण्यासाठी धनगर समाज आंदोलन करत आहे. मात्र एसटी समाजाचा धनगर समाजाला सामावून घेण्यास प्रखर विरोध आहे. यामुळे आरक्षणाचा मुद्दा सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी