31 C
Mumbai
Thursday, February 15, 2024
Homeमुंबईठाण्यात आज समतेचा जयघोष; 'सत्यशोधक दिंडी'चे आयोजन

ठाण्यात आज समतेचा जयघोष; ‘सत्यशोधक दिंडी’चे आयोजन

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुरोगामी विचारांचा जागर करत मुला-मुलींना शिक्षणाचे अमृत दिले आहे. चूल आणि मूल  संकल्पनेतून बाहेर काढत स्त्रियांना स्वतंत्र आणि सक्षमतेचा मार्ग दाखवणारे आणि दगडधोंडे खात येणारी पिढी शिक्षणाने उजळून निघावी यासाठी झटणारे थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. त्यांनी  २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस आता १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ठाण्यात आज  (२७ नोव्हेंबर) दिवशी सायंकाळी ४ सुमारास सत्यशोधक दिंडीचे आयोजन केलं आहे. अशी माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता यांनी दिली आहे.

सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला  १५० वर्षे झाली आहेत. २८ नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा महात्मा फुले स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला दिंडी काढण्यात येणार आहे. ज्योतिबा फुले हे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावर दीन-दुबळ्यांसाठी झटले. त्यांनी त्यांचे आयुष्य पणाला लावत शोषितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला. सत्याची कास धरून त्यांनी केलेल्या कार्याचा गजर आजही लोकं करत आहेत. महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी  किंबहुना फुले दाम्पत्याचा समतेचा विचार अधिक प्रभावीपणे समाजात पोहचवण्यासाठी  ठाणे जिल्ह्यातील महिला, कामगार, विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांना सोबत घेऊन  सत्यशोधक विचार संवर्धन समिती, ठाणे स्थापन करण्यात आली आहे. तसेच या समितीच्या माध्यमातून या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा

जालना औद्योगिक वसाहत केंद्रात जीएसटी पथकाची धाड

मार्शच्या ‘त्या’ कृत्यावर शमी भडकला

‘नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेसाठी दाखल’

सत्यशोधक दिंडीच्या उपक्रमाला ठाण्यातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (ठाकरे गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, रिपब्लिकन पक्ष (ऐक्यवादी), स्वराज इंडिया आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी सक्रीय पाठिंबा जाहीर करून या दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर असणार आहेत आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. इ. हरिदास हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार, आचार याची कास धरणाऱ्यांनी या कार्यक्रमास यावे असं आवाहन सत्यशोधक विचार संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी