33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा; राज्य शासनाचा मोठा निर्णय

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा; राज्य शासनाचा मोठा निर्णय

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठीच्या 'आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधी' (Balshastri Jambhekar) त अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. निवृत्त पत्रकारांना (journalists )देण्यात येणारी रक्कम 11 हजारा ऐवजी 20 हजार करण्यात यावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आली होती.

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठीच्या ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधी’ (Balshastri Jambhekar) त अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. निवृत्त पत्रकारांना (journalists )देण्यात येणारी रक्कम 11 हजारा ऐवजी 20 हजार करण्यात यावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आली होती.

बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून निवृत्त पत्रकारांना (journalists ) देण्यात येणाऱ्या सन्मान योजनेतून दरमहा देण्यात येणाऱ्या रक्कमेत राज्य शासनानं वाढ केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आज राज्य सरकारनं त्यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केलाय. त्यामुळं आता निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना (journalists )दरमहा 20 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते

या निर्णयाबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर (journalists )संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना सध्या 11 हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येतं. त्यात वाढ करुन ती 20 हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ही मागणी तत्काळ मान्य करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सन्मान योजनेची रक्कम 20 हजार रुपये करण्याची घोषणा केली होती.

ajit pawar;अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शरद पवार यांचं नाव वापरण्याची बंदी

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रविण पुरो यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांना जाब विचारुन घेराव घातला होता. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी शासन निर्णय जारी होईपर्यंत पाठपुरावाही केला.

अपघात की घातपात? ममता बॅनर्जींच्या डोक्याला तीन टाके, डॉक्टरांचा खळबळजनक दावा

पाठपुराव्यानंतर अखेर आज राज्य सरकारनं सन्मान योजनेची रक्कम 11 हजार ऐवजी 20 हजार करण्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केल्यानं राज्यातील जेष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांच्याह मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी