28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरक्रिकेटAsia Cup : भारत-हाँगकाँग आशिया कपमध्ये हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतची एन्ट्री

Asia Cup : भारत-हाँगकाँग आशिया कपमध्ये हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतची एन्ट्री

भारत आण‍ि हाँगकाँग यांच्यामध्ये एशिया कप मँच सुरू झाली आहे. हाँगकाँगचे कॅप्टन निजाकत खान यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. टीम इंडियाचे खेळाडू यावेळी देखील दमदार कामगिरी करणार आहेत अशी आशा सर्वांनाच लागली आहे. हार्दिक पंड्या आज भारतीय संघात खेळणार नाही.

भारत आण‍ि हाँगकाँग यांच्यामध्ये एशिया कप मँच सुरू झाली आहे. हाँगकाँगचे कॅप्टन निजाकत खान यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. टीम इंडियाचे खेळाडू यावेळी देखील दमदार कामगिरी करणार आहेत अशी आशा सर्वांनाच लागली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya)आज भारतीय संघात खेळणार नाही. त्याच्या जागी आज ऋषभ पंत खेळणार आहे. रोहित शर्मा, राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल हे खेळणार आहे.

हाँगकाँगच्या संघात निजाकत खान हा कर्णधार आहे. तर यासिम मुर्तजा, बाबर हयात, किनचित शाह, एजाज खान, स्कॉट मैककेन, जीशान अली, हारुन अरशद, एहसास खान, मोहम्मद, गजनाफर, आयुष शुक्ला हे खेळणार आहेत.आशिया कपच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा भारत हाँगकाँग मॅच होणार आहे. सर्वात पहिल्यांदा 2008 मध्ये भारत आणि हाँगकाँग खेळले होते. त्यावेळेस टीम इंडियाने पहिल्यांदा 50 ओवर्समध्ये 4 व‍िकेट घेऊन 374 रन काढले होते. महेंद्र सिंह धोनी आण‍ि सुरेश रैना या जोडीने शानदार शतक केले होते. धोनी 109 वर नाबाद राहिला होता. तर रैनाने 101 रन काढले होते. हाँगकाँगची टीम 118 रनवर आऊट झाले. भारताने 256 रन काढले होते.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : गणपती बाप्पाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे विघ्न दूर करावे – शरद पवार

Department of Archaeology : ऐन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 5 हजार वर्षे जुन्या गणेश मंदिरात पुरातत्त्व विभागाने केली तोडफोड

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्यामुळे माणमधील औद्योगिक कॉरिडॉर कोरेगावला स्थलांतरीत झाला, रामराजे नाईक निंबाळकर यांचा गंभीर आरोप

तर 2018 मध्ये आशिया कपच्या वेळी भारत हाँगकाँग लढत झाली होती. त्यावेळी भारत 26 रनने जिंकला होता.‍ आशिया कपमध्ये त्यावेळी उत्तम कामग‍िरी शिखर धवन याने केली होती. रविवारी रात्री आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले होते. त्यावेळी टॉस हरुन देखील टीम इंडीया 5 विकेटनी जिंकली होती. भारताने 19.4 ओवरमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. हार्दिक पंड्याने भारताला विजय मिळवून दिला होता. टीम इंडीयाचा तोच हिरो ठरला. आज हाँगकाँग बरोबर होणाऱ्या खेळामध्ये टीम इंडियाकडून विजयाची अपेक्षा आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी