29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयलबाडखोरांना शरद पवारांचे योगदान काय कळणार : प्रभाकर देशमुख

लबाडखोरांना शरद पवारांचे योगदान काय कळणार : प्रभाकर देशमुख

लबाडी व फसवणूकीवर ज्यांची राजकीय कारकीर्द उभी आहे. स्वार्थासाठी जे काहीही करायला तयार असतात. ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बाष्फळ बडबड करत आदरणीय शरद पवारांवर (Sharad Pawar) टिका करत आहेत. त्यांना शरद पवारांचे योगदान काय कळणार? असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला. भिलार येथे भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी देशाचे जेष्ठ नेते खा. शरद पवारांवर टिका केली होती. या टिकेचा आज प्रभाकर देशमुख यांनी खरपुस समाचार दहिवडी येथे पत्रकार परिषदेत घेतली.

प्रभाकर देशमुख म्हणाले, नेहमीप्रमाणे आमदार गोरे हे बरळताना शरद पवार यांच्यावर घसरले. ज्या व्यक्तीने यशवंतनितीने चालताना संपुर्ण देशात आपल्या कार्य कर्तृत्वाने योगदान दिले व केंद्र सरकारने ज्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान बाळगणे गरजेचे आहे. ज्या उरमोडीच्या पाण्यात हे नेहमी आंघोळीचा कार्यक्रम करतात ते पाणी माण-खटाव मध्ये खा. शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे आले आहे हे त्यांनी विसरु नये. उरमोडी धरण बांधून पुर्ण झाल्यानंतर तीन- चार वर्षे ते पाणी धरणात तसेच पडून होते. उरमोडी जोड कालव्यातून कन्हेर कॅनॉलमध्ये पाणी नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध होता.मी विभागीय आयुक्त असताना जिल्हाधिकारी रामास्वामी एन. यांना सोबत घेवून खा.शरद पवार यांची भेट घेतली व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खा. शरद पवार यांनी आ.शिवेंद्रराजे भोसले यांना बोलवून उरमोडी जोड कालव्याच्या कामास संमती देण्यास सांगितले. आ.शिवेंद्रराजे यांनी ती संमती मिळवून दिल्यानंतर फक्त दोन महिन्यात जलसंपदा विभागाने तो कालवा पुर्ण केला व उरमोडीचे पाणी माण-खटाव मध्ये आले हि वस्तुस्थिती आहे.

प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, गेली बारा वर्षे आमदार असताना टेंभूचे पाणी तुमच्या छाताडावरुन सांगलीला जात आहे. त्यावेळी तुम्हाला टेंभूच्या पाण्याचा थेंब माण-खटाव मध्ये आणता आला नाही. तुमचा स्वाभिमान त्यावेळी तुम्ही कुठे गहाण ठेवला होता? टेंभूच्या ८.५ टी.एम.सी. पाणी वाटपाबाबत खा.शरद पवार यांना मी व मुख्य अभियंता यांनी मुंबई येथे सविस्तर माहिती दिली.

शरद पवार यांनी पुढाकार घेवून तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून टेंभूचे अडीच टी.एम.सी. पाणी माण-खटावच्या ४८ गावांसाठी आरक्षित केले. योजनेच्या सर्व्हेचे आदेश दिले. त्यासाठी मी स्वतः शेतकर्‍यांना सोबत घेवून पाठपुरावा केला. माढ्याचे खासदार व कृषिमंत्री असताना आदरणीय शरद पवार यांनी एकात्मिक पाणलोट कार्यक्रमासाठी माण-खटावला १७५ कोटी रुपयांचा निधी दिला. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी दहा कोटी पेक्षा जास्त रक्कमेची मदत केली. त्यामुळे खा.शरद पवार यांच्याबद्दल बोलताना देश, राज्य, जिल्हा राहू द्या किमान माण-खटाव साठी दिलेल्या योगदानाबाबत कृतज्ञता असली पाहिजे. किमान माहिती घेवून बोला असा सल्ला सुध्दा प्रभाकर देशमुख यांनी आमदार गोरे यांना दिला.

हे सुद्धा वाचा :

शरद पवार म्हणाले, देशात बदलाचे वातावरण निर्माण होतयं

महायुतीला हरवण्यासाठी मविआ एकजुटीने निवडणूक लढवणार! जागावाटपाचे सूत्र हाती; काँग्रेसला सर्वात कमी जागा

असा राज्यपाल इतिहासात पाहिला नाही, शरम वाटली पाहिजे… शरद पवार कडाडले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी