26 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरमनोरंजनअभिनेत्री तुनिशा शर्मा अनंतात विलीन; अनेक कलाकारांची अंत्यदर्शनासाठी उपस्थिती

अभिनेत्री तुनिशा शर्मा अनंतात विलीन; अनेक कलाकारांची अंत्यदर्शनासाठी उपस्थिती

अलीबाबा दास्तान-ए-काबुल या मालिकेतील अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिच्यावर मंगळवारी दुपारी भाईंदर (पूर्व) येथील स्माशानभूमीत अंत्यसंस्कार (Funeral) केले.

अलीबाबा दास्तान-ए-काबुल या मालिकेतील अभिनेत्री तुनिशा शर्मा  (Tunisha Sharma) हिच्यावर मंगळवारी दुपारी भाईंदर (पूर्व) येथील स्माशानभूमीत अंत्यसंस्कार (Funeral) केले. यावेळी तिचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, सहकलाकार आणि चाहते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. भाईंदर येथील सरकारी रुग्णालयातून दुपारी तुनिषा हिचा मृतदेह तीच्या घरी आणण्यात आला. त्यांनतंर तिचे सहकलाकार, नातेवाईक, मित्र, चाहत्यांनी तिच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

यावेळी कंवर ढिल्लन, विशाल जेठवा, शिविन नारंग, हेअर स्टायलिस्ट- श्याम भाटिया आणि दिग्दर्शक अब्बास अलीभाई यांच्यासह अनेक टीव्ही कलाकार तिच्या घरी आणि स्मशानभूमीत त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. स्मशानभूमीत तिच्या मुलीचे अंत्यसंस्कार होत असताना पाहून तीच्या आईला दु:ख अनावर झाल्याने ती भोवळ येऊन कोसळली. तुनिषा तिच्या आईसोबत ज्या इमारतीत राहिली त्या इमारतीतील रहिवासीही त्यांना अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने जमले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला सहकलाकार शीझान खानची बहीण आणि आई देखील स्मशानभूमीत शोक व्यक्त करण्यासाठी आली होती.

हे सु्धा वाचा

अभिनेत्री तुनिशा आत्महत्या प्रकरण; आरोपी झीशानने सांगितले ब्रेकअपचे कारण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार; सीबीआयची याचिका हायकोर्टाने फोटाळली

शरद पवार आमदार जयकुमार गोरे यांच्या भेटीला; रुग्णालयात जावून केली तब्बेतीची विचारपूस

अलीबाबा दास्तान-ए-काबुल या मालिकेत शहजादी मरियमची भूमिका साकारणारी, तुनिषा शर्मा अनेक टीव्ही शो आणि काही चित्रपटांमध्ये दिसली आहे. भाईंदर (पूर्व) परिसरात राहणाऱ्या या 20 वर्षीय तुनिषाने 24 डिसेंबर रोजी वसईतील एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!