31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeएज्युकेशनशाळेत मराठी सक्तीबाबत राज्य सरकारचा यू-टर्न !

शाळेत मराठी सक्तीबाबत राज्य सरकारचा यू-टर्न !

महाराष्ट्र सरकारच्या अभ्यासक्रमाच्या शाळा वगळता राज्यातील इतर परीक्षा मंडळांच्या म्हणजेच सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिजच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाला 3 वर्षांकरिता सरळसरळ स्थगिती देण्यात आली आहे. या केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये आठवीनंतरच्या इयत्तांना मराठी विषय विद्यार्थ्यांच्या एकूण मूल्यांकनात धरण्यात येऊ नये, असा जीआरच राज्य शासनाने जारी केला आहे.

मराठी विषयाचा इतर विषयांच्या एकत्रित मुल्यांकनामध्ये समावेश करू नये या शासनाच्या भूमिकेमुळे मुले या विषयाकडे गांभीर्याने पाहणार नाहीत. शाळेकडे प्रशिक्षित तज्ञ शिक्षक असतील तर ही भाषा मुलांना शिकायला सोपी जाईल. मराठीचे गुण दखलपात्र नाहीत. केवळ मराठीप्रेमींची मागणी होती म्हणून मागे शासनाने नाइलाजाने मराठी विषय सक्तीचा निर्णय घेतला हे आता स्पष्ट झाले आहे. मराठी सक्ती उठवणारा हा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी मराठी शाळांकडून करण्यात येत आहे.

मुळात इंग्रजी बोर्डाच्या शाळांनी मराठी शिक्षक नेमले का? किती नेमले? त्यांचा अध्यापन स्तर काय होता याची कोणतीही शहानिशा न करता मुलांच्या मार्कावर मराठीचा वाईट परिणाम होत असल्याचे तुणतुणे इंग्रजी शाळांनी सुरू केले आहे. त्यात सरकारही मराठी भाषेची सक्ती उठवत आहे. एकंदरीत याने कीती मराठी शाळा टिकतील? असा संतप्त सवाल जाणकार नागरिकांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा:

जास्त फी उकळणाऱ्या खासगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात बदल करणार : दीपक केसरकर

आधारशिवाय शालेय प्रवेशाला तात्पुरती मान्यता; शिक्षण विभागाचा निर्णय

हिंदी, मराठी वृत्तवाहिन्यांसमोर नवे संकट; अनेकांना गमवाव्या लागणार नोकऱ्या!

मराठी भाषेच्या अध्यापन अध्ययन सक्तीची अंमलबजावणी कोरोना काळात सुरु झाली. परिणामी सक्तीच्या मराठी भाषा अध्यापन- अध्ययन प्रकियेवर प्रतिकूल परिणाम होऊन मराठी विषयाच्या अध्ययनामध्ये आणि पर्यायाने गुण मिळवण्यात या इंग्रजी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या आणि म्हणून ही सक्ती तीन वर्षांसाठी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, असे सांगण्यात येते. त्यामुळे पुढील तीन वर्षांकरिता मराठी भाषा केवळ ‘श्रेणी’ पुरतीच मर्यादित राहणार आहे. म्हणजेच मराठी विषयाचे गुण एकूण मूल्यांकनात धरण्यास तीन वर्षांकरिता स्थगिती देण्यात आली आहे. मुलाला मराठी किती येते हे ए, बी, सी, डी अशा श्रेणी देऊन नोंदवले जाईल. या मूल्यांकनाचा समावेश परीक्षा मंडळाच्या इतर विषयांच्या गुणांच्या मूल्यांकनामध्ये करण्यात येणार नाही. म्हणजेच मराठी शिकला नाही म्हणून कुणीही विद्यार्थी नापास होणार नाही.

School, Marathi subject, Marathi School, Marathi subject compulsory decision has been postponed for 3 years, maharashtra school

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी