31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्राईममनी लॉंड्रिंग प्रकरण दाऊद गँग ईडीच्या रडारवर

मनी लॉंड्रिंग प्रकरण दाऊद गँग ईडीच्या रडारवर

इकबाल मिरची प्रकरणात तपास करताना ईडी अधिकाऱ्यांना अनेक गोष्टीचा उलगडा झाला आहे. दाऊद गॅंगची अनेक लोक मनी लॉंड्रिंगच्या व्यवहारात सक्रिय असल्याचं उघडकीस आलं आहे. या पार्श्वभूमीवर ईडीने आता दाऊदचे सदस्य असलेल्या अनेक लोकांच्या विरोधात तपास सुरू केला आहे. एकूणच दाऊद गँग आता ईडीच्या रडारवर आहे.
ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणात इकबाल मिरची यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात मिरची यांची पत्नी आणि दोन मुलांना अटक ही झाली आहे.या तपासात मिरची कसा ड्रग्स तस्करीत सक्रिय होता याचा उलगडा झालेला आहे. त्याच प्रमाणे तो मनी लॉंड्रिंगचा कसा करायचा याचा ही उलगडा झालेला आहे. मिरची हा दाऊद गँगचा सदस्य होता. आणि तो गँगसाठी ड्रग्सचा धंदा बघायचा. मिरची 2013 सालात लंडन मध्ये मयत झाला आहे. मात्र, ईडीचा तपास सुरूच आहे.

यानंतर एनआयएने दाऊद गँग विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दाऊद गँग हत्यार तस्करी, नार्को टेरिरिझम, मनी लॉंड्रिंगचा आणि फेक करन्सी या धंद्यात आहे. हे सर्व धंदे बेकायदेशीर असून देश विघातक आहेत. त्याच प्रमाणे दाऊद गँगचा अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध आहे. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील लष्कर ए तैबा, जैश ए मोहमद आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांशी संबंध आहे.

एनआयएच्या तपासात ही दाउद गँग मनी लोंदरिंग मध्ये कशी सक्रिय आहे, याचा उलगडा झालेला आहे. त्यातच इकबाल मिरची प्रकरणात त्याचा साथीदार हुमायून मर्चंड याने चेन्नई येथून खोट्या कागदपत्रे वापरून आयडीबीआय बँकेत खाते उघडलं होत. त्या द्वारे 6 कोटी 60 लाख रुपये मिरची याला पाठवल्याच उघडकीस आलं आहे.

ईडीने मिरची विरोधात जो गुन्हा दाखल केला आहे तो त्याच्या विरोधात मुंबई पोलिसात दाखल गुन्ह्याचा आधारावर केला आहे. मात्र, त्याचे सर्व कागदपत्रे आता गहाळ झाली आहेत.यामुळे ईडीचा तपास अडचणीत आला आहे.याचा परिणाम कोर्टाच्या सुनावणीवर होऊ शकतो, अस ईडीच्या अधिकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, त्यावर पर्याय शोधण्याच काम आता सुरू आहे. एनआयएची माहिती आणि चेन्नई येथे दाखल गुन्ह्याचा आधार ईडी घेण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

राऊत आणि पटोले : कोण चोमडे, कोण चाटू ? महाविकास आघाडीत शाब्दिक गुद्दागुद्दी

देशातील सायबर हल्ले रोखण्यासाठी व्हीजेटीआयमध्ये होतंय संशोधन..!

आजकाल बातम्यांना अनेक रंगांची आवरणे असतात, त्यामुळे सत्य शोधणे कठीण : राज्यपाल रमेश बैस

एनआयए आणि हुमायून मर्चंट यांच्या तपासात डी गँगसाठी मनी लॉंड्रिंग करणाऱ्या अनेक लोकांची नाव उघडकीस आली आहेत. त्या दाऊद गँगच्या दृष्टीने ईडीचा तपास सुरू झाला आहे. दाऊद गँग आता ईडीच्या रडारवर असणार आहे.

Money laundering case
Dawood gang on ED’s radar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी