29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमफ्लॅट धारकांची फसवणूक निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डराना जामीन नाकारला

फ्लॅट धारकांची फसवणूक निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डराना जामीन नाकारला

फ्लॅट विकण्याच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करण्याच्या गंभीर आरोपा खाली मुलुंड स्थित निर्मल लाईफ स्टाईल बिल्डर्सला अटक करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई आज करण्यात आली आहे.बिल्डर धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना आता 16 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.यावेळी बिल्डर भावांनी जामिनासाठी अर्ज केला होता.तो अर्ज कोर्टाने फेटाळला.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहिती प्रमाणे पोलिसांकडे आतापर्यत एकूण 34 फ्लॅट खरेदी करणार्यांनी तक्रार केली असून जवळपास 11 कोटीं रुपयांची फसवणूक केल्याच तपासात समोर आलं आहे. तक्रारदारांची ही संख्या आणि फसवणुकीची रक्कम ही जास्त असल्याचा पोलिसांना संशय आहे .

आरोपीनी सर्वसामान्य लोकांना फ्लॅट देण्याच्या नावाखाली फावणूक केली आहे.फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले. मात्र, अनेक वर्ष उलटले तरी देखील लोकांना त्यांचे फ्लॅट दिले नाहीत.या प्रकरणी 2022 सालात एफ आय आर दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी धर्मेश जैन आणि राजीव जैन या दोघांना 27 एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे.दोघांना संबंधित कोर्टात हजर केल असता 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.ही कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं असता.न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

विशेष बाब अशी आहे की धर्मेश जैन हे निर्मल लाईफ स्टाईल मुलुंड या कंपनीचे संचालक आहेत. जैन यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र, ज्या ज्या लोकांनी फ्लॅटची बुकिंग केली.त्यांना वेळेवर फ्लॅट मिळाले नाहीत. त्याचबरोबर त्यांनी जे पैसे गुंतवले होते ते पैसे देखील त्यांना परत मिळाले नाहीत. म्हणून लोकांनी अखेर पोलिसांकडे दाद मागितली.

पोलिसांनी या संदर्भात वर्ष 2022 मध्ये गुन्हा दाखल केला.त्याची चौकशी सुरू होती.मात्र,चौकशी अंति दोन्ही बिल्डरला अटक करण्यात आलेली आहे. बिल्डर अटक झाल्यानंतर इतर ज्या कोणाला या बिल्डर्सनी फसविल आहे, ते मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली तक्रार करू शकतात. जेणेकरून हा हाऊसिंग घोटाळा म्हणजे फ्लॅट विकण्याच्या नावाखाली करण्यात आलेला मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

हे सुद्धा वाचा

मनी लॉडरिंग प्रकरण दाऊद गँग ईडीच्या रडारवर

राऊत आणि पटोले : कोण चोमडे, कोण चाटू ? महाविकास आघाडीत शाब्दिक गुद्दागुद्दी

देशातील सायबर हल्ले रोखण्यासाठी व्हीजेटीआयमध्ये होतंय संशोधन..!

त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर जैन यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला.युक्तिवाद केला.यावेळी अमेथस्ट निर्मल को ऑप सो ली.च्या वकिलांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला.यानंतर त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

Fraud of flat holders
Builders of Nirmal Lifestyle denied bail

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी