36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeजागतिकदेशातील सायबर हल्ले रोखण्यासाठी व्हीजेटीआयमध्ये होतंय संशोधन..!

देशातील सायबर हल्ले रोखण्यासाठी व्हीजेटीआयमध्ये होतंय संशोधन..!

भारतात सायबर हल्ले अर्थात गुप्त माहिती चोरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. अलीकडेच "एम्स" या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या संगणक आणि संकेतस्थळावर मोठा हल्ला झाला. सायबर हल्ले ही आता चिंतेची बाब झाल्यामुळे मुंबईतील वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूटने सायबर हल्ले रोखण्याबाबत संशोधन सुरू केले आहे.

भारतात सायबर हल्ले अर्थात गुप्त माहिती चोरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. अलीकडेच “एम्स” या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या संगणक आणि संकेतस्थळावर मोठा हल्ला झाला. सायबर हल्ले ही आता चिंतेची बाब झाल्यामुळे मुंबईतील वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूटने सायबर हल्ले रोखण्याबाबत संशोधन सुरू केले आहे.

आपल्या देशात मोबाईल आणि संगणक वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड जास्त आहे. प्रत्येकाजवळ मोबाईल असून लॅपटॉप, डेस्कटॉपवर कार्यालयीन कामकाज केले जाते. सॉफ्टवेअरशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयावर झालेल्या सायबर हल्ल्यात महत्त्वपूर्ण डेटा चोरीला गेल्यामुळे सर्वसामान्य मोबाईलधारक आणि संगणक वापरणाऱ्यांची चिंता वाढली आहे. सायबर हल्ले रोखण्यासाठी व्हीजेटीआयमध्ये सुरू असलेल्या संशोधनाविषयी सायबर तज्ञ डॉ. बंडू मेश्राम यांनी सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले, २२१ च्या मालवेअर रिपोर्टनुसार रँडसमवेअर आणि बिटकॉइन क्रिप्टो करेंसीमुळे जगभरात सायबर हल्ले खूप वाढले आहेत. क्रिप्टो करन्सीमुळे सायबर हल्लेखोरांना शोधणे अशक्य झाले आहे. आपण अँड्रॉइड फोन किंवा संगणक वापरत असताना फिशिंग ईमेलकडे लक्ष देण्याची गरज आहे. सायबर हल्लेखोर हल्ला करताना फिशिंग ईमेलचा वापर करतात. फिशिंग ई-मेल द्वारे हल्ला करण्याचे जगभरातील प्रमाण ७० टक्के इतके आहे.

ई-मेलसोबत असलेल्या अटॅचमेंटमधून वायरस सोडून सायबर हल्ला केला जातो. ई-मेल अटॅचमेंट मधून हल्ला होण्याचे प्रमाण जगभरात ५४ टक्के इतके आहे. कोणत्याही असुरक्षित संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर सर्च करणारे वापरकर्ते ४१ टक्के आहेत. स्पॅम मेलमधून देखील कुठल्याही संगणक प्रणालीवर हल्ला होऊ शकतो. ज्या सर्विस प्रोव्हायडर एजन्सीकडे तुम्ही गेलेला डेटा पुन्हा मागता, त्या एजन्सीवर देखील हल्ला केला जाऊ शकतो, असे मेश्राम यांनी सांगितले.

सायबर हल्ला टाळण्यासाठी शासकीय अथवा खाजगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा बाळगण्याची गरज आहे. त्यासाठी या कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. सुरक्षित वेबसाईट, सॉफ्टवेअर किंवा अप्लीकेशन ओळखता आल्याशिवाय सामान्य जनतेला हल्ला कसा रोखावा, हे समजणार नाही. मोठमोठ्या शासकीय किंवा खाजगी एजन्सीकडून कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर खर्च केला जात नाही. त्यामुळे हल्लेखोर सुरक्षा यंत्रणा भेदून डेटा चोरण्यासाठी सायबर हल्ला करतात.

हे सुद्धा वाचा :

भाजपला सुरूंग लावण्यासाठी महादेव जानकर यांनी तयार केला रोडमॅप !

महादेव जानकरांनी चांगल्या राजकारण्यांची यादी सांगितली, पण फडणविसांचा उल्लेखही केला नाही !

अदानीच्या मालकीच्या ‘एनडीटीव्ही’ सर्वेक्षणात भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष

सर्वच शासकीय खाजगी एजन्सी किंवा प्रत्येक नागरिकाने  शासनाने अधिकृत केलेल्या सर्विस प्रोव्हायडरकडून पेनिट्रेशन चाचणी करून घेतली पाहिजे. संगणकामधील तंत्राची खोलवर माहिती करून घेणे गरजेचे आहे. नेटवर्क ट्रॅफिक विश्लेषण करून नियम तोंडणाऱ्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे. सायबरवर देखील नेटवर्क ट्रॅफिक विश्लेषक ठेवून एक सर्वर खराब झाल्यास दुसरा सर्वर समांतरपणे चालवून आपण धोका टाळू  शकतो. अनोळखी मेल, बेकायदेशीर एप्लीकेशन किंवा असुरक्षित वेबसाईट किंवा संशयास्पद युआरएल लिंक याचा सावधानपणे वापर केला पाहिजे. ही खबरदारी घेतल्यास सायबर हल्ला टाळता येणार असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी