30 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरक्राईमकॉलेजच्या आवारातच विद्यार्थिनीचा चिरला गळा; नंतर स्वत:वरच केले चाकूने वार

कॉलेजच्या आवारातच विद्यार्थिनीचा चिरला गळा; नंतर स्वत:वरच केले चाकूने वार

बंगळूरु (कर्नाटक) (Bangalore) मध्ये प्रेसीडेन्सी कॉलेजमध्ये  (Presidency College) एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय तरुणीची चाकूने वार करुन हत्या (Murder of girl) केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घटली. यावेळी तरुणीवर हल्ला करणारा तरुण देखील जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. या तरुणाची प्रकृती देखील गंभीर असल्याचे वृत्त आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणीने आरोपी तरुणाच्या प्रेमाला नकार दिल्याने तरुणाने हे कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कॉलेजचे सुरक्षा रक्षक तरुणीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. आरोपी तरुणाचे नावर पवन कल्याण असून तो २१ वर्षांचा आहे. तर मृत तरुणीचे नाव लेस्मिथा आहे. आरोपी पवन याने प्रेसीडेन्सी कॉलेजच्या परिसरात तरुणीवर चाकू हल्ला केला.

लेस्मीथाची हत्या केल्यानंतर आरोपी पवन याने स्वत:वर देखील चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पवनला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मृत तरुणीने पवन कल्याण याच्याशी प्रेमाला नकार दिल्याने तो अस्वस्थ होता. त्या रागातूनच पवन कल्याण याने कॉलेजच्या आवारात लेस्मिथा हिच्या गळ्यावर वार करुन तीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:वर देखील चाकूने वार केले.

हे सुद्धा वाचा 

दिल्लीत कारने तरुणीला चार किमी फरफटत नेले; मृत तरुणीची आई म्हणाली हा कसला अपघात?

मुख्यमंत्र्यांच्या हेलीपॅडजवळ आढळला जिवंत बॉम्ब

VIDEO : जितेंद्र आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूर; पण…

पोलिसांनी सांगितले की, लेस्मिथाला पवन कल्याण याने वर्गाबाहेर बोलवले त्यानंतर १० ते १५ मिनिटे दोघांमध्ये बोलणे झाले. त्यानंतर आरोपी पवन याने बॅगेतून चाकू काढला आणि लेस्मिथावर चाकूने वार केला. त्यानंतर त्याने स्वत:वर देखील चाकूने वार केले. सुत्रांच्या माहितीनुसार आरोपी तरुण आणि मृत तरुणी कोलार जिल्ह्यातील मुलबगल गावाशेजारील काछीपूरा येथील रहिवासी आहेत. तर हल्ल्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्यांनी पोलिसांना सांगतले की, लेस्मिथावर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी पवन याने स्वत:वर चाकूने अनेक वार केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!