30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमTerror Funding : टेरर फंडिंग प्रकरणात विद्यार्थ्याला अटक; 'आयएसआय'च्या होता संपर्कात

Terror Funding : टेरर फंडिंग प्रकरणात विद्यार्थ्याला अटक; ‘आयएसआय’च्या होता संपर्कात

दहशतवादी कारवायांसाठी निधी (TERROR FUNDING) उभारणाऱ्या एक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून तो मुळचा पंजाब मधील भवानीगड जिल्ह्यातील आहे. तो चंदीगढ येथील पंजाब विद्यापीठात एमएचे शिक्षण घेत आहे.

दहशतवादी कारवायांसाठी निधी (TERROR FUNDING) उभारणाऱ्या एक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून तो मुळचा पंजाब मधील भवानीगड जिल्ह्यातील आहे. तो चंदीगढ येथील पंजाब विद्यापीठात एमएचे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्याला राज्य विशेष कारवाई पथक (State Special Operation Cell) ने अटक केली आहे. अर्शदीप असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. एसएसओसीच्या पथकाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर या पथकाने या तरूणाला चंदिगड येथून ताब्यात घेतले. आरोपी अर्शदीप हा परदेशात बसलेल्या लखबीर सिंग लांडा आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य गोल्डी ब्रार याचा साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे.

परदेशातून आयएसआयचे हस्तक अर्शदीपच्या बँक खात्यावर पैसे पाठवत होते. त्याच्या बँक खात्याच्या तपशीलाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला दुबई, अमेरिका, फिलीपिन्स, इटली आणि मलेशिया येथे राहणारे मुळ पंजाबी आयएसआयसाठी निधी आणि शस्त्रे पुरवण्यासाठी कार्यरत असलेल्या स्लीपर सेलच्या माध्यमातून आरोपींना टेरर फंडिंग केले जात होते.
एसएसओसी पथक आरोपी अर्शदिप याच्या त्यांच्या बँक खात्यांची चौकशी करणार आहे. त्याच्या खात्यात आतापर्यंत किती निधी जमा झाला हे याबाबत हे पथक आता सखोल तपास करणार आहे. तसेच आरोपीने तो तो निधी कुठे वापरला आहे याचा देखील तपास केला जाणार आहे. आरोपी अर्शदिप बऱ्याच दिवसांपासून गोल्डी ब्रार आणि लखबीर लांडा यांच्या संपर्कात होता, असी माहिती देखील समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा :
Indira Gandhi : डॉ. जितेंद्र आव्हाडांनी सांगितले इंदिरा गांधींचे मोठेपण !

Winter Healthy Drinks: हिवाळ्यात सर्दीने केलंय त्रस्त; हे 7 प्रकारचे ज्यूस वाढवतात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती

Worli Koliwada Children Die : वरळी कोळीवाडा समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू; तर तीन मुलांवर उपचार सुरू

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी ब्रार कॅनडामध्ये लपून बसला असून तो तिथून पंजाबमध्ये आपली टोळी चालवत आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत गोल्डी ब्रारचाही हात आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर या हत्येची जबाबदारी स्वीकारत त्याने विकी मिड्डूखेडाच्या हत्येचा बदला घेतल्याचे त्याने म्हटले होते.
या प्रकरणाचा एसएसओसी पथक कसून तपास करत आहे. या आरोपी विद्यार्थ्याचे बॅँक खात्याची सध्या तपासणी सुरू असून त्याच्या बॅँक खात्यावर कुणी पैसे पाठवले, तसेच त्यानं कोणाकोणाला पैसे पाठवले यांचा तपास पथक करत आहे. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचे हस्तक त्याच्या संपर्कात होते त्यामुळे त्याने आणखी काही माहिती दहशतवादी कारवायांसाठी पाठविली आहे काय याचा देखील कसून तपास केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी