33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeमुंबईMumbai Mahanagarpalika : मुंबईसाठी नुसत्याच विकासाच्या गप्पा; शौचालयांअभावी महिलांची कुचंबना

Mumbai Mahanagarpalika : मुंबईसाठी नुसत्याच विकासाच्या गप्पा; शौचालयांअभावी महिलांची कुचंबना

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. असे असतानाही शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची भीषण अवस्था आहे. तसेच, सर्वाधिक कमी स्वच्छता गृह देखील मुंबईमध्ये आहे. मुंबईत दर 1820 महिलांमागे एक स्वच्छतागृह आहे, तर 58 टक्के शौचालयांमध्ये अंधार पसरलेला आहे.

महिलांना त्यांच्या गरजेनुसार स्वच्छतागृहे देण्यात मुंबई महानगरपालिका अपयशी ठरली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे. मुंबईत सरासरी 1 हजार 820 महिलांसाठी एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे, तर 752 पुरुषांसाठी एक स्वच्छतागृह उपलब्ध आहे. त्याच वेळी, 4 सार्वजनिक शौचालयांपैकी फक्त 1 महिलांसाठी आहे. तसेच 58 टक्के शौचालयांमध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छ भारत अभियानानुसार 100 ते 400 पुरुष आणि 100 ते 200 महिलांसाठी एक शौचालय असायला हवे, पण मुंबईत महानगरपालिकेचे काम स्वच्छ भारत अभियानाच्या आकड्याच्या जवळपासही जात नाही.

42 टक्के मुंबईकरांच्या आवारात शौचालय नाही
सुमारे 42 टक्के मुंबईकरांना त्यांच्या परिसरात शौचालय नाही, तर 94.8 टक्के लोक हे सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. प्रजा फाऊंडेशनचे योगेश मिश्रा म्हणाले की, 45 हजार कोटी रुपयांचे बजेट असलेली मुंबई महानगरपालिका महिलांना त्यांच्या गरजेनुसार शौचालये उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या शौचालयाच्या सर्वेक्षणाच्या निकालावरून असे दिसून आले आहे की, मुंबईतील केवळ 28 टक्के शौचालये पाईपने सांडपाणी प्रणालीला जोडलेली आहेत. त्याचप्रमाणे 2019 पर्यंत मुंबईत 45 पुरुष आणि 36 महिलांसाठी एक सामुदायिक स्वच्छतागृह उपलब्ध आहे, तर स्वच्छ भारत अभियानानुसार, 35 पुरुष आणि 25 महिलांसाठी एक स्वच्छतागृह असायला हवे.

हे सुद्धा वाचा

Terror Funding : टेरर फंडिंग प्रकरणात विद्यार्थ्याला अटक; ‘आयएसआय’च्या होता संपर्कात

Indira Gandhi : डॉ. जितेंद्र आव्हाडांनी सांगितले इंदिरा गांधींचे मोठेपण !

Shraddha Murder Case : आफताबची होणार नार्को टेस्ट; न्यायालयाने दिले आदेश

पाणी कनेक्शन योग्य नाही
सर्वेक्षणानुसार 72 टक्के शौचालये सीवरेज लाइनला जोडलेली नाहीत. त्याचबरोबर 78 टक्के शौचालयांमध्ये पाण्याच्या कनेक्शनची योग्य व्यवस्था नाही. गेल्या दशकात बीएमसीकडे शौचालयांबाबतच्या तक्रारी 230 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 2012 मध्ये शौचालयांबाबत 148 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या 2021 मध्ये वाढून 489 झाल्या. मुंबईतील एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी केवळ 25 टक्के महिलांसाठी, 71 टक्के पुरुषांसाठी आणि 4 टक्के अपंग नागरिकांसाठी आहेत. चौकशी केली असता, बीएमसीच्या जनसंपर्क विभागाकडे या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.

टॉयलेट सीटसाठी दीड लाख रुपये खर्च
ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 दरम्यान, मुंबईतील प्रमुख झोपडपट्टी भागांपैकी एक असलेल्या गोवंडी झोपडपट्टीतील 188 सार्वजनिक शौचालयांमध्ये 3587 टॉयलेट सीट बसवण्यात आली. बीएमसीने येथे प्रति सीट दीड लाख रुपये खर्च केले आहेत. या टॉयलेट सीट बसवण्यासाठी मुंबई मनपाने 53.8 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी