28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeक्राईमम्हसरुळ येथे भाजी मार्केटमध्ये कोयता बाळगून फिरणारे दोघे अटकेत

म्हसरुळ येथे भाजी मार्केटमध्ये कोयता बाळगून फिरणारे दोघे अटकेत

म्हसरुळ येथील भाजी मार्केटमध्ये कोयता बाळगून फिरणाऱ्या दोघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. संशयितांकडून तीन कोयते, एक चाकू व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. धनराज गोकुळ लांडे (रा. मखमलाबाद लिंकरोड, म्हसरुळ), हर्षल राजू मोंढे (रा. दिंडोरी रोड, म्हसरुळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार देविदास ठाकरे यांना दोघा संशयितांची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सोमवारी (ता. १५) म्हसरुळ येथील भाजी मार्केटमध्ये फिरणाऱ्या या दोघांना ताब्यात घेतले.

म्हसरुळ येथील भाजी मार्केटमध्ये कोयता बाळगून फिरणाऱ्या (roaming) दोघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. संशयितांकडून तीन कोयते, एक चाकू व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. धनराज गोकुळ लांडे (रा. मखमलाबाद लिंकरोड, म्हसरुळ), हर्षल राजू मोंढे (रा. दिंडोरी रोड, म्हसरुळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार देविदास ठाकरे यांना दोघा संशयितांची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सोमवारी (ता. १५) म्हसरुळ येथील भाजी मार्केटमध्ये फिरणाऱ्या या दोघांना ताब्यात घेतले.(Two arrested for roaming around in vegetable market in Mhasrul )

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला कोयते व चाकू आढळून आला. पथकाने दोघांकडून तीन कोयते, एक चाकू व यामाहाची दुचाकी (एमएच १५ जेके ६५९८) असा ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन इंगळे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, शरद सोनवणे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, अप्पा पानवळ, राजेश राठोड, किरण शिरसाठ, नाझीम पठाण यांनी बजावली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी