32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeव्हिडीओनगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुम्ही देखील हि बातमी ऐकून चकित झाला असाल , तर काय आहे या बातमी मागची बातमी पाहुयात.... अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन निलेश लंके नावाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके या उमेदवाराने अपक्ष अर्ज भरला आहे.

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in the Ahmednagar city). तुम्ही देखील हि बातमी ऐकून चकित झाला असाल, तर काय आहे या बातमी मागची बातमी पाहुयात….
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन निलेश लंके नावाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके या उमेदवाराने अपक्ष अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. निलेश लंके यांनी शरद पवार गटात केलेल्या पक्षप्रवेशानंतर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्या चाललेलं वाकयुद्ध हे सर्वांनाच माहितीये. सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेंना इंग्रजी भाषा न येण्यावरून केलेली टीका असेल किंवा सुजय विखे पाटलांना पैश्यांची मस्ती आहे असं त्यावर लंकेंनी दिलेलं प्रत्युत्तर असेल.. हा वाद अजूनही सुरूच आहे. आणि त्यातच निलेश लंके नामक व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरण्यावरून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलेच तापलेले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करुन सुजय विखे यांच्यावर टीकादेखील केली आहे. त्या ट्विट मध्ये निलेश ज्ञानदेव लंके सुजय विखे पाटलांना उद्देशून म्हणतात कि ,
” सुजयजी मानले तुम्हाला, माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या डमी कारभारासारखाच.. परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो, पैशाच्या बळावर उमेदवार डमी उभा कराल ही.. पण मतदान रुपी जनता डमी तयार करता येत नाही एवढं लक्षात ठेवा. परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी ”.
” केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी,
पण आता जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी