31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयVIDEO : देवेंद्र फडणविसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; बदल्यांमध्ये ‘अर्थ’पूर्ण व भयानक प्रकार

VIDEO : देवेंद्र फडणविसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; बदल्यांमध्ये ‘अर्थ’पूर्ण व भयानक प्रकार

टीम लय भारी

पुणे : पार्थ पवारांचा विषय हा पवार घराण्याचा कौटुंबिक विषय आहे. आम्हाला त्या विषयात पडायचे नाही. हा विषय त्यांच्या परिवारातील आहे. परिवारानेच तो सोडवावा, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे ( Devendra Fadnavis says, Parth Pawar is a family issue ).

फडणवीस शनिवारी पुणे दौऱ्यावर आले होते ( Devendra Fadnavis visits Pune in corona pandemic ). या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

बदल्यांमध्ये ‘अर्थ’पूर्ण व्यवहार

बदल्यांच्या संदर्भात जे काही चालले आहे, ते अनाकलनीय असे आहे. जे ऐकायला मिळत आहे ते तर त्यापेक्षाही भयानक आहे ( Devendra Fadnavis slams to Mahavikas Aghadi government on officers transfers issue ). पोलीस महासंचालकांनी ‘चुकीच्या पद्धतीने मी बदल्या करणार नाही. गरज पडली तर मी सोडून देईन’ असे म्हटले आहे. अशी अवस्था असेल तर हे अत्यंत गंभीर आहे.

‘कोविड’च्या परिस्थितीत बदल्या नसत्या केल्या तरी चालले असते. पण राज्य सरकारने १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यातून मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या गेल्या आहेत. पण बदल्या करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. ज्यांच्या तुम्ही बदल्या केल्या आहेत, त्यांना भत्ता द्यावा लागतो. त्यामुळे अनाठायी खर्च झाला आहे. ‘अर्थ’पूर्ण बोलण्यातून बदल्या केल्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत. हे अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले.

‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये अंतर्गत भांडणे आहेत. त्यांनी सरकार सुरळीत चालवावे. सरकारमध्ये काय चालले आहे हे कुणालाच लक्षात येत नाही, असाही टोला त्यांनी हाणला ( Devendra Fadnavis says, there is internal clashes in Mahavikas Aghadi government ).

हे सुद्धा वाचा

Breaking: पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, ५ सप्टेंबरपर्यंत नवी मुदत

मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये घोटाळा, सीआयडी चौकशी करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात बदल्यांच्या फाईलींचा ढीग

मंत्रालयात भरलाय बदल्यांचा बाजार

Breaking : तहसिलदारांच्या बदल्यांचा आदेश जारी; वाचा तुमच्या तालुक्यात कोण आले, कोण गेले

Breaking : उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यात कोण आले, कोण गेले

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

आदित्य ठाकरेंचा राजीनामा भाजपने मागितलेला नाही

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल अशी विधाने नारायण राणे यांच्या कुटुंबातून करण्यात आली आहेत. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान उडवून लावले.

आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केलेली नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यावर नारायण राणे यांनी राजीनाम्याची मागणी केली असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, भाजपच्या कोणत्याही नेत्याने अशी मागणी केली नसल्याचा पुनरूच्चार फडणवीस यांनी केला ( Devendra Fadnavis says, BJP didn’t demand resignation of Aaditya Thackeray ).

बिहारपेक्षा महाराष्ट्र पोलीस उत्तम

महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मी पाच वर्षे महाराष्ट्र पोलिसांबरोबर काम केले आहे. या पोलिसांची क्षमता काय आहे याची पूर्ण कल्पना मला आहे. पण बऱ्याचदा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. तसे पोलिसांनी दडपणाखाली काम करू नये. अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात जनभावना तयार झाली. या भावनेतून हे प्रकरण सीबीआयकडे गेले पाहिजे अशी मागणी होऊ लागली. म्हणून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले आहे. सर्वोच्च न्यायालय त्यावर योग्य निर्णय घेईल. महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांची तुलनाच होऊ शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तमच आहेत ( Maharahtra Police is best in India compare to Bihar).

राजकारणापेक्षा कोरोना प्रादुर्भाव रोखणे महत्वाचे आहे. ॲण्टीजन टेस्ट होताहेत. पण आर्टिफिशल टेस्टही वाढवायला हव्यात. टेस्ट वाढविल्या तर मृत्यूदरही कमी करता येईल (More corona testing are need ) . भारतीय जनता पक्षातर्फे मला बिहार निवडणुकीत सहाय्य करण्याची जबाबदारी दिली आहे ( Bihar election responsibility given to Devendra Fadnavis). ते काम मी करेन, असे फडणवीस म्हणाले.

lay bhari

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक कराMahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी