27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयBreaking: पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, ५ सप्टेंबरपर्यंत नवी मुदत

Breaking: पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, ५ सप्टेंबरपर्यंत नवी मुदत

टीम लय भारी

मुंबई : पोलिसांच्या बदल्यांना सुरूवातीला १० ऑगस्ट, नंतर १५ ऑगस्ट आणि आता नव्याने ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ( Mahavikas Aghadi government postponed police transfers ).  

बदल्यांना मुदतवाढ देण्याचा सुधारित आदेश आजच जारी करण्यात आला आहे. त्याची प्रत ‘लय भारी’च्या हाती लागली आहे. या आदेशानुसार आता ५ सप्टेंबरपर्यंत पोलिसांच्या बदल्यांना मुदतवाढ दिली आहे.

गणेशोत्सवाचा लवकरच सुरू होत आहे. या कालावधीत पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असतो. अशा परिस्थितीत बदल्या करणे अयोग्य ठरेल. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या बदल्यांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात बदल्यांच्या फाईलींचा ढीग

मंत्रालयात भरलाय बदल्यांचा बाजार

मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये घोटाळा, सीआयडी चौकशी करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

तहसिलदारांच्या बदल्यांचा आदेश जारी; वाचा तुमच्या तालुक्यात कोण आले, कोण गेले

उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यात कोण आले, कोण गेले

वास्तवात मात्र, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व सरकार यांच्यात मतभेद वाढू लागले आहेत. राजकीय दबावाने होणाऱ्या बदल्यांवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिका जयस्वाल यांनी घेतली आहे. हेच नव्या मुदतवाढीमागील खरे कारण असल्याचे विश्वसणीय सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

Mahavikas Aghadi government postponed transfers
राज्य सरकारने पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ दिली आहे

‘महाविकास आघाडी’ सरकारने इतर खात्यात मोठ्या प्रमाणात केलेल्या बदल्यांवरून सध्या वादंग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होऊनच या बदल्या झाल्याची खमंग चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

या बदल्यांमुळे अनेक कार्यक्षम अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना संधीही मिळाली आहे. परंतु मलईदार पदांवरील बदल्या या केवळ आर्थिक देवाणघेवाणीतूनच झाल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही बदल्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. बदल्यांची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी