33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeसंपादकीयArnab Goswami : भारतीय पत्रकारितेला चिटकलेला ‘कोरोना’

Arnab Goswami : भारतीय पत्रकारितेला चिटकलेला ‘कोरोना’

अ‍ॅड. विश्वास काश्यप

अलिकडच्या काळात भारतातील प्रसारमाध्यमे भरकटत चालली आहेत. व्रतस्थ पत्रकारिता केव्हाच लयाला गेली आहे. अर्णव गोस्वामीसारख्यांनी ( Arnab Goswami ) तर पत्रकारितेचा बाजार मांडला आहे. भारतातील ९५ % मीडिया हा पत्रकारितेच्या नावावर दलाली करीत आहे. ‘दलाली’ हा अतिशय सौम्य आणि सभ्य शब्द मी वापरला आहे. आणखी समर्पक शब्द वापरायचा झाल्यास तो काय असेल याचा संबंधितानी विचार करावा.

कुठे नेऊन ठेवली आहे यांनी पत्रकारिता. एखाद्या वेश्येशी तुलना करणे म्हणजे त्या बिचाऱ्या वेश्येची सुद्धा बदनामी होईल, इतकी हीन पातळी प्रसारमाध्यमांनी गाठली आहे.

Coronavirus

देशाला, महाराष्ट्राला पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, डॉ. नानासाहेब परूळेकर, प्रबोधनकार ठाकरे, रामनाथ गोयंका, एन. राम, विनोद मेहता, माधव गडकरी, कुमार केतकर, निळकंठ खाडीलकर अशा अनेक उत्तुंग व्यक्तीमत्वांचा वारसा भारतीय पत्रकारितेला लाभलेला आहे. निखील वागळे, ज्ञानेश महाराव अशा व्रतस्थ पत्रकारांचेही मराठी पत्रकारितेत नाव घ्यावेच लागेल.

बदलत्या पत्रकारितेत राजदीप सरदेसाई, रवीशकुमार अशा पत्रकारांनीही पत्रकारितेची बूज राखून ठेवली आहे. अशी आणखीही काही नावे घेता येतील. पण ही परंपरा आता ढासळत चालल्याचे दिसत आहे.

स्वातंत्र्य चळवळीत पत्रकारितेचे मोठे योगदान होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’ने उभी केली. सामाजिक प्रश्न पोटतिडखीने मांडायचे आणि सरकारला धारेवर धरायचे हे पत्रकारितेचे रूप आम्ही पाहिले आहे. त्यासाठी व्रतस्थ पत्रकारांनी आपले करिअर सुद्धा पणाला लावले.

पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. पत्रकारांनी आपल्या लेखणीने, वाणीने समाज प्रबोधन केले आहे. समाजातील अनिष्ठ प्रथांवर कठोर भाषेत आसूड ओढलेले आहेत. पत्रकार म्हणजे ज्ञानी, अभ्यासू, समाजाप्रती आस्था बाळगणारा जबाबदार घटक.

ही झाली पत्रकारीतेच्या परंपरेबद्दलची आम्हाला असलेली समज...

पण सध्या काय चालू आहे… ?

असे म्हणतात की, एखादं नवीन चॅनेल सुरू करण्यासाठी कमीत कमी २०० – ३०० कोटींची गरज लागते. म्हणजे हे २०० – ३०० कोटी गुंतवणूक करणारे धुतल्या तांदळासारखे असतील का ? इतकी मोठी रक्कम गुंतविणारा उद्योगपती, व्यक्ती, समूह यांच्याकडे मुळात इतके पैसे येतात कुठून ?

कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला तरी इतकी प्रचंड रक्कम आली कुठून हे सर्वसामान्य जनतेला कळायला नको का ? भ्रष्ट पैसे गुंतवून चॅनेल सुरू करायचे आणि भ्रष्टाचार कोणी केला, कसा केला यावर दिवसभर, रात्रभर, आठवडाभर चर्चा घडवून आणायची. त्यानंतर ज्याने भ्रष्टाचार केला आहे त्याच्याशीच ‘सौदा’ करून ती बातमी दाखविणे बंद करायचे.

धंदा करण्यासाठीच हे अशा बातम्या ‘लावत’ असतात. पूर्वी जाहिरात हे प्रसारमाध्यमांच्या कमाईचे साधन होते. पण आता चक्क ‘बातम्या’च विकल्या जातात. वरून आव मात्र प्रखर राष्ट्रभक्तीचा व प्रमाणिकतेचा आणतात. प्रत्यक्षात मात्र दलालीचा, भ्रष्टाचाराचा धंदा मांडल्याचे दिसत आहे. ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ अशातला हा प्रकार.

सध्याचा समाज अधिकाधिक भ्रष्ट, कट्टर धार्मिक, अनैतिक होऊ लागला आहे. असा हा बेजबाबदार समाज घडविण्याचे काम ९५ % भ्रष्ट दलाली करणाऱ्या मीडियाने केले आहे.

भ्रष्ट अधिकारी, मंत्री यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच हे ‘दांडू बहाद्दूर’ संपादक झाले आहेत. अर्णव गोस्वामी हे त्याचे मुर्तीमंत उदाहरण. मुळात अशा संपादकांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे. मुंबईतील काही ‘दांडू बहाद्दर’ पत्रकारांच्या संपत्तीत किती गुणोत्तर पद्धतीने वाढ झाली आहे हे जर आपण पाहिले तर अस्सल खंडणीखोर परवडले पण हे नको असे आपणास वाटल्याशिवाय राहणार नाही.

पाच सहा वर्षांपूर्वी परराज्यातून आलेले हिंदी / इंग्रजी भाषक दांडूबहाद्दर संपादक मुंबईमध्ये कमीत कमी दोन ते तीन आलिशान प्लॅट घेऊन बसले आहेत. काय त्यांचा माज आणि रुबाब ! जसे काय सरकार हेच चालवतात. बडे अधिकारी यांच्याच तालावर नाचतात.

बडे भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट मंत्री आपली पापे झाकण्यासाठी स्वतःच्या पापात यांना सुद्धा सामील करून घेतात. हे अतिशहाणे आणि अशाच वेळेची प्रतीक्षा करणारे डोमकावळे दांडू बहाद्दर या पापात आनंदाने सामील होतात. मग हेच दांडूबहाद्दर आम्हाला नैतिकतेचा धडा शिकविणार. भ्रष्टाचार करणारा किती वाईट याची बातमी दिवसभर चालविणार.

धर्मा – धर्मात तेढ निर्माण करणे, प्रस्थापित सत्ताधारी पक्षाची उघड उघड बाजू घेऊन निःपक्षपाती पत्रकारितेचे धिंडवडे काढणे, भ्रष्ट मार्गाने पैसे जमा करून संपत्ती मिळवत राहणे, एखाद्या निष्पाप व्यक्तीला – संस्थेला बदनाम करून त्यांना समाजातून कायमचे संपवून टाकणे, एखादा अजेंडा चालवून समाजात दोन गट तयार करणे असा पायंडा आधुनिक पत्रकारितेने पाडला आहे.

अर्णव गोस्वामी ( Arnab Goswami ) हा कोणत्या कोनातून पत्रकार वाटतो हे अजून उमगलेले नाही. रस्त्यावर दारू पिऊन मोठमोठ्याने ओरडणाऱ्या बेवड्यापेक्षाही बराच काही वाटतो. स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेल्या पाहुण्यांचा अपमान करायला त्याला थोडी सुद्धा लाज वाटत नाही.

अतिशय घाणेरड्या मनोवृत्तीचा, बेशिस्त, घमेंडखोर, नालायक आणि प्रचंड भ्रष्ट असलेला हा माणूस. टिव्हीवरील त्याचा थयथयाट पाहताच क्षणी डोक्यात तिडीक जाते. असा मग्रूर व मस्तवाल दलाल.

माझ्या आठवणीनुसार त्याची मस्ती राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी उतरविली होती.

अर्णव गोस्वामीचे ( Arnab Goswami ) निरीक्षण केले तर तो बिनडोक,  ब्राह्मणी –  संघी प्रवृत्तीचा असल्याचे लक्षात येते. या व्यक्तीला जेव्हा पत्रकार म्हणून आम्ही मान्यता द्यायला सुरुवात केली, त्या दिवसापासूनच पत्रकारितेचा ऱ्हास सुरू झाला.

दीड दमडीची विद्वता नसलेला हा गृहस्थ स्वतःला पत्रकार समजायला लागला आणि देशाचे वातावरण बिघडवू लागला.

काय यांचा अभ्यास, काय बुद्धिमत्ता, काय मानसिक संतुलन, काय यांच्या आवाजाची मर्यादा ! सगळ्या भूतलावरचे ज्ञान यांनाच आहे असे हे तिनपाट महाशय भासवू लागले आहेत.

एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख महिला नेत्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करायला या तिनपाट अर्णव गोस्वामीची ( Arnab Goswami ) हिंमत होतेच कशी ?

अरे बाबा तुझी लायकी काय ? साधी दीड दमडीची विद्वत्ता सुद्धा नाही तुझ्याकडे. तुझे शिक्षण किती ? तू बोलतो किती ? समाजाच्या जडणघडणीत तुझा वाटा किती ? देशासाठी तुझे योगदान काय ? ज्या सत्ताधिशांच्या जोरावर तू माकडउडया मारतोस त्यांची सत्ता उद्या गेल्यावर तुला ऑफिसमध्ये झाडू मारायला सुद्धा कोणी ठेवणार आहे का ?

या अर्णव ‘भाई’चे ( Arnab Goswami ) किंचाळणे पाहून दुसरेही अनेक पत्रकार असेच किंचाळत सुटले आहेत. कर्कशपणे किंचाळणे म्हणजे त्या मूर्खांना पत्रकारिता वाटू लागली आहे. या अर्णब ‘भाई’च्या कलासमध्ये बऱ्याच भगिनी पत्रकार सुद्धा सहभागी झाल्या आहेत. त्या सुद्धा नेटाने किंचाळतात.

या सरकारच्या काळात अर्णब ‘भाई’च्या ( Arnab Goswami ) डोक्यात हवा गेली आहे. तो उघड उघड हिंदुत्वाचा प्रचार करायला लागला आहे. त्याला कदाचित राज्यसभेची खासदारकी खुणावत असेल. काय सांगावे सरकार त्याला त्याच्या या ‘इमानीपणा’बद्दल एकादा तुकडा टाकील सुद्धा. पण ‘एवढासा’ तुकडा चघळायला मिळावा म्हणून तो बेभानपणे भुंकायला लागला आहे.

अर्णव गोस्वामी ( Arnab Goswami ) हा पत्रकारितेला लागलेला कलंक आहे. चांगल्या पत्रकारांना सुद्धा पत्रकार म्हणवून घ्यायला आता लाज वाटत असेल.

‘कोरोना’ने ( Arnab Goswami ) जगभरात थैमान घातले आहे. अर्णव ( Arnab Goswami ) हा पत्रकारितेला चिटकलेला ‘कोरोना’ आहे. या ‘कोरोना’चा संसर्ग अनेक पत्रकारांना होऊ लागला आहे. केंद्र सरकारच्या प्रायोजित कार्यक्रमातूनच हा विषाणू पसरत चालला आहे. किमान राज्य सरकारने तरी अर्णव नावाच्या या विषाणूवर योग्य औषध शोधायला हवे.

दुर्दैवाने समाजालाही असेच भंपक पत्रकार आवडतात. स्वतःच्या मेंदुचा वापर करणारा समाज कमी होत चालला आहे. हिंदुत्वाची नशा चढलेल्या अनेकांना चांगले व वाईट कळेनासे झाले आहे. सामान्य लोकांच्या डोक्यात धर्माचे विष ओतण्याचे काम सुरू आहे. अर्णव गोस्वामीसारखे ( Arnab Goswami ) दलाल हे विष लोकांच्या मनात कालवण्याचे काम इमाने इतबारे करीत आहेत.

समाजातील जबाबदारी आता वाढली आहे. निःपक्षपाती असणाऱ्या चॅनेल्सची निवड आम्हाला करावी लागणार आहे. जर तसे वातावरण नसेल तर बहिष्कार घाला त्या चॅनेलवर. राज्य शासनाने सुद्धा तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशा विध्वंसक प्रवृत्तीच्या पत्रकारांवर. यांच्या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत त्यांच्या उत्पादनावरही जनतेने बहिष्कार घातला पाहिजे.

(लेखक मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात, आणि ते निवृत्त पोलीस अधिकारी आहेत)

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Arnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती आत्महत्या

Lockdown2 : भाजप आमदाराच्या पत्रावर मुंबई ते संगनमेर महिलेचा प्रवास

Arnab faces multiple FIRs for anti-Sonia remarks after blaming Congress for midnight ‘attack’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी