32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रArnab Goswami : ‘वाईट पत्रकारिते’च्या विरोधातही हल्ला करणे अयोग्य : प्रेस कौन्सिल

Arnab Goswami : ‘वाईट पत्रकारिते’च्या विरोधातही हल्ला करणे अयोग्य : प्रेस कौन्सिल

टीम लय भारी

मुंबई : ‘रिपब्लीक भारत’चे संपादक अर्णव गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याबद्दल प्रेस कौन्सिलने निषेध नोंदविला आहे. परंतु हा निषेध व्यक्त करतानाच कौन्सिलने ‘वाईट पत्रकारिता’ असा शब्दप्रयोग करून गोस्वामी यांना अनुल्लेखाने कानपिचक्या दिल्या आहेत.

गोस्वामी यांच्यावरील कथित हल्ल्याची ‘प्रेस कौन्सिल’ने स्वतःहून दखल घेत एक पत्रक जारी केले आहे.

Coronavirus

‘पत्रकार म्हणून अर्णव गोस्वामी यांनी कथित मत मांडल्यावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजले, अन् मनाला वेदना झाल्या. पत्रकारांसहित देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे. ही मते पचनी पडणारी नसली तरी गळा दाबून आवाज बंद करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही.’ अशी खंत कौन्सिलने व्यक्त केली आहे.

‘वाईट पत्रकारितेच्या विरोधातही हल्ला करणे हे उत्तर असू शकत नाही’ असे नमूद करीत कौन्सिलने गोस्वामी यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या आहेत, व हल्ल्याचाही विरोध केला आहे.

‘प्रेस कौन्सिल या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे. राज्य सरकारने हल्लेखोरांना पकडून लवकर न्याय मिळवून द्यावा’ असे नमूद करीत कौन्सिलने मुख्य सचिवांमार्फत राज्य सरकार व मुंबईच्या पोलीस आयुक्तांना ‘लवकर वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या’ सुचना केल्या आहेत.

दरम्यान, ‘एडिटर्स गिल्ड’नेही एक पत्रक जारी करून गोस्वामी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

अर्णव गोस्वामींवरील एफआयआरसंबंधी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अर्णव गोस्वामी ( Arnab Goswami ) यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्ये केली, तसेच धार्मिक विद्वेष पसरविणारी वक्तव्येही केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात गोस्वामी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पाच राज्यांमध्ये असे एफआयआर दाखल झाले आहेत.

या एफआयआरला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सकाळी १० वाजता सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. मोहित शाह यांच्या खंडापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Arnab Goswami : भारतीय पत्रकारितेला चिटकलेला ‘कोरोना’

Arnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती आत्महत्या

Rajdeep Sardesai slams Arnab Goswami over his resignation from Editors’ Guild

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी