32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown2 : भाजप आमदाराच्या पत्रावर मुंबई ते संगनमेर महिलेचा प्रवास

Lockdown2 : भाजप आमदाराच्या पत्रावर मुंबई ते संगनमेर महिलेचा प्रवास

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’मुळे ( Lockdown2 ) कोणत्याही व्यक्तीला बाहेरगावी प्रवास करता येत नाही. परंतु भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी एका महिलेला चक्क मुंबईवरून संगमनेर (जि. अहमदनगर) येथे जाण्यासाठी पत्र दिले. या पत्राच्या आधारावर संबंधित महिलेने प्रवास पूर्ण केल्याची खळबळजनक माहिती ‘लय भारी’ला मिळाली आहे.

Coronavirus

‘लॉकडाऊन’मुळे ( Lockdown2 ) सध्या कोणालाच प्रवासाला परवानगी मिळत नाही. खूपच तातडीचे कारण असेल तर पोलीस खात्यामार्फत डिजिटल पास दिला जातो. त्यामुळे संबंधित महिलेला पास मिळवून देण्यासाठी कोळंबकर यांनी पोलिसांना विनंती करणे गरजेचे होते.

असे असतानाही आमदार कोळंबकर यांनी ‘लॉकडाऊन’चे ( Lockdown2 ) सगळे नियम धाब्यावर बसविले व स्वतःच्या स्वाक्षरीने संबंधित महिलेला प्रवासाचे पत्र दिले. हे पत्रच ‘लय भारी’च्या हाती लागले आहे.

Lockdown2
आमदार कोळंबकर यांनी दिलेले हेच ते बेकायदा पत्र

‘संबंधित महिलेला 23.4.2020 रोजी मुंबई ते संगमनेर असा प्रवास करायचा आहे. या प्रवासात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे’ असे पत्रात म्हटले आहे. पत्रामध्ये संबंधित महिलेचे नाव, गाडी क्रमांक व वाहन चालकाचेही नाव नमूद करण्यात आले आहे.

या पत्राच्या आधारे संबंधित महिलेने मुंबई ते संगमनेर असा ‘सुखरूप’ प्रवास सुद्धा पूर्ण केला आहे. परंतु या प्रवासा दरम्यान तिला ( Lockdown2 ) कुणीच कसे अडविले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबियांना असेच ( Lockdown2 ) बेकायदा पत्र दिले होते. या पत्रामुळे गुप्ता यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. हा प्रकार ताजा असतानाही आमदार कोळंबकर यांनी संबंधित महिलेला पत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत आमदार कालिदास कोळंबकर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘जाऊ द्या ना, तुम्ही बातमी करू नका. लोकांना वेगवेगळ्या अडचणी असतात. कुणाच्या घरी निधन झालेले असू शकते. त्या महिलेच्या घरीही कुणाचे तरी निधन झाले असेल. मग अशा वेळी पत्र द्यायला नको का ? पत्र द्यायचे अधिकार पोलिसांना आहेत. मी पत्र द्यायला नको होते. म्हणून मी पत्रात पोलिसांचाच उल्लेख केला आहे. मी 40 वर्षे आमदार आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, तुम्ही बातमी करू नका’

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी

NCPvsBJP : ‘गृह सचिव गुप्ता यांनी ते पत्र स्वतःहूनच दिले, शरद पवार – देशमुखांची मान्यता नाही’

अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवर पाठविले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी