27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeसंपादकीयcoronavirus cure : ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी..

coronavirus cure : ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी..

coronavirus cure : … अन्यथा ‘कोरोना’चा फैलाव वेगाने होईल

  • प्रा. राजन वेळूकर (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) 
  • प्रा. के. एस. भानू
शेवटच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी वुहान सोडले आहे. कोव्हीड-१९ हा विषाणू ( coronavirus cure ) वुहान चांगल्या गोष्टीसाठी सोडेल अशी अपेक्षा करु शकतो. परंतु हा विषाणू लोकांच्या मनातून आणि हृद्यातून कधीच जाणार नाही. हे फक्त चीनमधील लोकांच्या बाबतीत नाही तर जगातील प्रत्येकाच्या मनात याने घर करुन ठेवल्याने लोकांच्या मनातून सहजासहजी जाणार नाही.

या विषाणूच्या ( coronavirus cure ) प्रादुर्भावाने संपूर्ण जग व्यापलं आहे. सर्वत्र भीतीचं आणि दहशतीचे वातावरण आहे, अनेकांच्या मनात समज – गैरसमज सुद्धा आहेत. आता या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर नजर टाकूया. जेव्हा मी हा लेख लिहायला घेतला तेव्हा म्हणजेच २२ मार्च २०२० रोजी कोरोना विषाणुने बाधीत झालेल्यांची १० नवीन प्रकरणं उघडकीस आली होती. त्यापैकी ६ मुंबईतील तर ४ पुण्यातील. अशी आतापर्यंत ७४ प्रकरणे उघडकीस आलीत.

सर्वप्रथम पुण्यात ३ मार्चला २ प्रकरणे उघडकीस आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होऊ लागली. १५ मार्च रोजी संक्रमण झालेल्या ३३ ची संख्या झपाट्याने वाढत गेली व वाढत आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील ही संख्या अधिक आहे. असे म्हटले जाते की ही वाढ रेषीय (Linear) पद्धतीने होत आहे. परंतु आपण येणाऱ्या एक – दोन आठवड्यात कसोशीने आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाही तर ही परिस्थिती ( coronavirus cure ) आवाक्याबाहेर जाऊ शकते, आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल, हेही खेदाने नमूद करावेसे वाटते.

ही वाढ घातांक (Exponential ) पद्धतीने होईल. हेच गणितीय पद्धतीने समजवून सांगायचं झाल्यास :

समजा Nd – कोणत्याही दिवशी सक्रीय प्रकरणांची संख्या आहे.

A – संक्रमित व्यक्ति (विषाणूमुळे संक्रमित झालेली एखादी व्यक्ती) दररोज किंवा संपर्कात राहिली आहे. अशा लोकांची सरासरी संख्या

P- प्रत्येक संक्रमित व्यक्तिंपासून इतराना संक्रमण होण्याची संभावना (Probability)

दर दिवसाला नवीन संक्रमणाची प्रकरणे म्हणजेच दैनदिन बदल ज्याला आपण म्हणूया Nd तर आपणास खालील सुत्र मिळते.

Nd = A x P x Nd

    किंवा

Nd +1 = Nd + A x P x Nd

जर दररोज नवीन प्रकरणांची संख्या अस्तित्वात असलेल्या प्रकरणांच्या संख्येच्या प्रमाणात असेल तर याचा अर्थ  असा आहे की, दररोजच्या प्रकरणांची संख्या विद्यमान प्रकरणांची संख्या  हे A आणि P  दोन्हीवर अवलंबून असलेल्या गुणाकाराने प्राप्त केली जाऊ शकते.

वरील नात्याचा वापर करुन, जर आम्हाला संक्रमण झालेल्यांची पुढील दिवसांची संख्या कळू शकते व परिस्थिती किती भयावह होऊ शकते याची कल्पना येऊ शकेल. हे सोप्या भाषेत स्पष्ट करण्यासाठी दिनांक २२ मार्चच्या प्रकरणांची संख्या घ्या, जी ७४ आहे.

संसर्ग होण्याची संख्या शक्यता जास्त होण्याची शक्यता आणि एक्सपोझरची सरासरी संख्या विचारात घेतल्यास घटक (A X P) ने १५ टक्के  म्हटल्यास तीस दिवसानंतर संक्रमितांची संख्या ७४ x (१.१५) ३० = ४८९९ होईल. परंतु हे गुणोत्तर १.०५ असेल ( इन्फेक्शन दर ५ टक्के फक्त असेल तर ) संक्रमितांची संख्या ३० दिवसात फक्त १२९ असेल. याचाच अर्थ घाईघाईने (Exponential Growth) अशी होते.

आधी सांगितल्या प्रमाणे जर (A x P) हे गुणोत्तर जर एकपेक्षा जास्त जसजसे वाढत जाईल तसतशी संख्या झपाट्याने वाढत जाईल. कोव्हीड-१९चा प्रादुर्भाव जर असाच झपाट्याने वाढत राहिला तर परिस्थिती आटोक्यात येणार नाही, व नंतर जे काही होईल त्याची कल्पना न केलेली बरी. एक बाब विशेष नमूद करावीशी वाटते आणि ती जमेची बाब म्हणजे आपण अजून त्या भयावह स्थितीपर्यंत पोहोचलेलो नाही. आपल्याला पोहचायचं पण नाही. ईश्वराच्या व आपल्या स्वतःच्या कृपेने पोहचूही नये.

संक्रमितांची संख्या कमी ( coronavirus cure ) करण्यासाठी राज्य शासन युद्धपातळीवर पाऊलं उचलत आहे.  (A x P) हा गुणाकार घटक १ वर किंवा त्याहूनही खाली आणायचा आहे. यासाठी आपण  सर्वांना, आपल्या स्वतःला, कुटुंबियांना, समाजातील इतर घटकांना आणि शासनाच्या सहभागातून सहकार्य करायचे आहे. पर्याय नाही. त्यासाठी आपणास सार्वजनिक मेळावे टाळणे, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी न जाणे, घरी सुरक्षित राहणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, विमानामध्ये ज्या प्रकारे सूचनांचे आपण पालन करतो ( coronavirus cure ) तसेच यावेळीही आपणांस शासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे, शासनाने दिलेल्या हाकेला आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे.

अशा महत्वाच्या टप्प्यामागील तर्कशास्त्र आणि युक्तीवाद अगदी सोपा आहे. जर लोक एकमेकांशी अंतर ठेऊन कमी वेळा संवाद साधत असतील तर विषाणूच्या फैलावास ( coronavirus cure ) संधी कमी आहे. कारण यामुळे A आणि P दोन्ही कमी होतील. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, एकट्या व्यक्तिच्या चुकीच्या वागण्यामूळे लहरी प्रभाव (Ripple Effect ) येऊ शकतो, जो दूरगामी परिणाम करणारा असेल.

आपण आताच जागे झालो नाही ( coronavirus cure ) तर अनेक दिवसांचा कर्फ्यू पाळावा लागेल, परिणामी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि इतर प्रश्नांना समोरे जावे लागेल. त्यामुळे शासन आणि आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच वागा अन्यथा आपला देश इटली आणि स्पेन होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. आपण कृतीने व जबाबदारीने वागून स्वतःचे कार्य करूया.

चला तर कोरोना विषाणूची साखळी संकल्प करुन, स्वयंशिस्तीने, संयमाने, सहकार्याने तसेच सहभागाने तोडूया.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

CoronaVirus : राजपुत्रालाही कोरोनाची लागण

Coronavirus चा अमेरिकेत उद्रेक : पंधरा दिवसांत 900 वरून 53 हजार रूग्णांची वाढ

UN appeals for $2bn to help poorer nations cope

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी