33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयकुमारस्वामी ते तिवारी, थरूर आणि मुंडे!

कुमारस्वामी ते तिवारी, थरूर आणि मुंडे!

  • अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

राजकारणात आणि समाजकारण यामध्ये असलेली कोणतीही व्यक्ती ही नेहमीच प्रत्येकाच्या थर्ड आय वर (gossip) राहिलेली असते. या व्यक्तींचे सामाजिक, खासगी जीवन आणि गुप्त पण काहो खुमासदार वर्तन हे सातय्याने चवीने चर्चिले जाते. मग या चर्चा थेट अशा व्यक्तीच्या बेडरूम पर्यन्त जातात. नको तितका रस घेऊन या प्रकारात संपूर्ण वस्त्रहरण करण्याचा मालिका सुरू होते. याच मालिकेतील नवा हिरो आता आहे ते म्हणॆ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे.

कुमारस्वामी ते तिवारी, थरूर आणि मुंडे!

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपाने वातावरण ढवळून निघत असतानाच मुंडे यांनीच फेसबुकवर या संपूर्ण प्रकरणावर स्वतःला व्यक्त केले. बलात्काराचा आरोप करणारी तरुणी ही मुंडे यांच्या दुस-या पत्नीची सख्खी बहीण असल्याचे निष्पन्न झाले. मुंडे यांनी आपण दुसरे लग्न केले असल्याचे कबूल करून या पत्नी पासून झालेल्या अपत्यांना आपले नाव लावल्याचे मुंडे यांनी या पोस्ट मध्ये नमूद केले आहे. मुळात मुंडे यांनी दुसरा विवाह का केला , कधी केला याची यापूर्वी कधीही जाहीर वाच्यता झाली नव्हती. या पोस्ट मध्ये त्यांनी मेहुणीने केलेल्या आरोपाचे खंडन केले.

आता या निमित्ताने देशाच्या राजकीय वर्तुळात यापूर्वी अनेक नेत्यांच्या खासगी आयुष्याबद्दल उठलेल्या वादळाची उजळणी सुरू झाली. जी प्रकरणे आतापर्यंत जाहीरपणे चर्चिली गेली आहेत त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री , माजी राज्यपाल अशो विविध पदे भूषविलेल्या नारायणदत्त तिवारी यांचे नाव अग्रक्रमाने येते. तिवारी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी विवाह केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.तत्पुर्वी ज्या महिलेशी त्यांनी विवाह केला होता त्या उज्वला शर्मा यांचा मुलगा रोहित शेखर याने नारायणदत्त तिवारी हेच आपले वडील असल्याचे सांगून न्यायालयीन लढाई लढली होती. त्यासाठी मग डीएनए चाचणी करण्यात आल्यावर रोहित हाच नारायनदत्त तिवारी यांचाच मुलगा असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मग तिवारी यांनी आपण दुसरा विवाह 14 मे 2014 साली केला होता याची कबुली दिली. त्याआधी त्यांचा पहिला विवाह 1954 मध्ये झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची देशभर खुमासदार चर्चा झाली होती.

याच साखळीतील आणखी एक नाव म्हणून शशी थरूर हे समोर येते. रंगील आणि बिनधास्त वर्तन अशी सर्वदूर ओळख असलेल्या थरूर यांनी आतापर्यंत तीन विवाह केले आहेत. त्यापैकी तिसरी पत्नी सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू आणि त्यामधून उठलेले संशयाचे वादळ यामुळे थरूर चर्चेत होते. एरव्हीही ते कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री च्या सलगी मुळे चर्चेत असतात.

याच श्रुखलेतील आणखी एक मोठे नाव म्हणजे कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते कुमारस्वामी. कन्नड अभिनेत्री राधिकाबरोबर कुमारस्वामी यांनी गुप्त विवाह केला होता. या विषयावर प्रचंड आरोप प्रत्यारोप होऊन कुमारस्वामी यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली होती. कुमारस्वामी यांचा हा दुसरा विवाह. पहिल्या पत्नी पासून त्यांना एक मुलगा आहे. तर राधिकापासून त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले आहे. या छुप्या विवाहावरून एकच गदारोळ उठला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. हिंदू वैयक्तीक कायद्याअंतर्गत त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सबळ पुराव्याअभावी ही याचिका फेटाळली गेली.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतही अप्सरा आणि बरखा या चौफुला येथील तमाशा नर्तिकीवरून मोठे वादळ उठले होते. तर सांगलीच्या एका खासदाराचे आणि कोल्हापूर मधील एका आमदाराचे नाव लोकप्रिय अभिनेत्री बरोबर जोडून त्याची गावभर चर्चा करण्यात येत होती. हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेत्रीची नावे आजही काही लोकप्रतिनिधी बरोबर जोडली जात आहेत. यामध्ये किती तथ्य हा महत्वाचा मुद्दा असला तरी लोकांचा त्या संपूर्ण काल्पनिक अथवा ख-या असलेल्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजमनात दिसुन येतो.

विविध क्षेत्रातील अनेक लोकप्रिय चेह-याची व्यक्तिगत आणि खासगी माहिती ही अनेकांना माहीत नसते. समाज अशा लोकांकडे एक आयकॉनिक म्हणून पाहत असतो. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात प्रवास करताना समाजातील अनेक जण आपल्याला फॉलो करत असतात याचे किमान भान तरी या सर्व मंडळींनी ठेवायला हवे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी