29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसंपादकीययुद्ध का थांबत नाही?

युद्ध का थांबत नाही?

लय भारी (सरला भिरुड): ईस्राइल आणि हमास यांनी केलेल्या एकमेकांवर हल्ल्याने जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची कारणे समजून घ्यायला हवी. इतिहासात गेले की ही कारणांची मिमांसा कळते. भारताप्रमाणेच हा परिसरही ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात होता आणि तिथेही ब्रिटिशांनी फोडा आणि तोडा हे धोरण अवलंबले होते पण एवढेच युध्दाचे कारण नाही. 7 ऑक्टोबर या दिवशी ज्यूंची पवित्र सण असतांना हमासने हा हल्ला केला आणि इस्राइलची मिलिटरी गाफील असताना एक आश्चर्यजनक हल्ला केला. दक्षिण ईस्रायल भागांमध्ये मिलिटरी ठाण्यांवर आणि रहिवासी ठाण्यांवर एकदंर तेराशे लोकांना मृत्यू झाला आणि काही हजारो घायाळ झाले. अचानक झालेला हल्ला नाही पण त्या सणाच्या दिवशी केलेला हल्ला हा ही आश्चर्यजनक बाब होती. या हल्ल्यामध्ये जो वापर झालेला आहे त्यामध्ये मिसाईल, जेट आणि काही डेंजरस प्रकारचे हत्यारे सामील आहेत. त्यामुळे इथे मानवीय जीवनावर पांढऱ्या फॉस्फरसमुळे जो हल्ला झाला आणि जे काही १९०० का गाजा पट्टीतले ही लोक मारले गेले. आणि इस्राएल अजून काही १.१ मिलियन लोक तिथे राहतात, जे उत्तर गाझाचा भागात आहे आणि त्यांनी दक्षिण भागात २४ तासाच्या आत सोडावे लागले. प्रश्न असा आहे की हमास ने अचानक असा हल्ला का केला?

“कुणीही माणूस पूर्णपणे स्वायत्त्य अशा बेटासारखा नाही प्रत्येक जण महाद्वीपापाशी जोडलेला आहे त्याचा अंश आहे”. डन यांचे हे उद्गार आहेत. आशिया मध्ये छेडल्या गेलेल्या युध्दाचा अप्रत्यक्ष का होईना आपल्यावर परिणाम होणारच.. इतिहास म्हणजे वर्तमानकाळ आणि भुतकाळ यामधील चालणारा संवाद आहे असे ई.एच. कार म्हणतात. का एवढ्या प्रमाणात ही धुसफूस सुरू आहे याचे उत्तर शोधण्यासाठी इतिहासात डोकावून पाहिले पाहिजे. पण त्याआधी वर्तमानातील घटनांचा विचार करता येईल.

सात ऑक्टोबर रोजी ज्यू लोकांचा सण सीमचात तोरात होता, त्याच दिवशी हमास या संस्थेने अनपेक्षितरित्या दक्षिण ईस्राइल वर हल्ला केला आणि त्यांच्या मिलिटरी बेसेस वर आणि रहिवाशी लोकांवर हल्ला करत तेराशे लोकांना मृत्यू आला. काही बरीच हजारो संख्यांनी जखमी झाले हा मोठा मिलिटरी हल्ला होता आणि त्याला प्रत्युत्तर देणे सहाजिकच आहे, यात  वापरले गेले शस्त्रे ही अत्याधुनिक आणि बरीच मोठी घातक होती. त्यामध्ये पांढरा फॉस्फरस जो जास्ती प्रमाणात घातक होता. इस्राएल लोकांनी ड्रोन हल्ल्याला निष्प्रभ करणारी व्यवस्था उभारलेली आहे तरीही हमासच्या लोकांजवळ जवळपास पाच हजार रॉकेट आहे आणि ही एवढी अत्याधुनिक शस्रे त्यांच्या जवळ आली कुठून आणि का ? हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रत्युत्तर देतांना इस्राएलने १९०० लोकही या युद्धात पुढे मारली गेली. १.१ मिलीयन  लोकांना २४ तासात तिथून उत्तर गाजा पट्टीतून स्थलांतरित व्हायला सांगितले, दक्षिण भागामध्ये होय.

हमासने हा हल्ला का केला? 

ईस्राएलने गेली काही वर्षापासून आपली व्यवस्था मजबूत केली आहे आणि पॅलेस्टाईन लोकांना पासून दूर ठेवले आहे. तसेच बरेच चेक पॉइंट आणि बॅरियर्स वेस्ट बँक या भागात लावलेले आहेत. हमासला सध्यस्थिती बदलायची होती हे एक उत्तर झाले. काय होती सध्या स्थिती?  तर पॅलेस्टाईनचा प्रश्न हा दुर्लक्षित झाला होता असे लक्षात येते आणि अरब देशांबरोबर संबंध सुधारत होते आणि एक नॉर्मलायझेशन एग्रीमेंट २०२० मध्ये केले. आणि इस्राइल ला एक प्रकारे कन्सेशन मिळाले. पॅलेस्टाईन्स पासून  होय. त्यामुळे सौदी अरेबिया आणि इस्राइल यांचे वरच्या स्तरावरील बोलणी मागच्याच आठवड्यात झाली. इस्राइलच्या दृष्टीने ही सध्या परिस्थितीची पॅलेस्टाईन प्रश्नावर संरक्षित होती आणि त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात मॅनेज केले आणि हा  प्रश्न परत एकदा लोकांसमोर आशियाच्या राजकारणाच्या समोर आणण्याच्या दृष्टीने हमासने  हल्ला केला असे याचे उत्तर संभाव्य उत्तर असू शकते. मग आताची सद्यस्थिती काय आहे?  हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो, तीन प्रकारचे बाबीमध्ये होय. ऐतिहासिक दृष्ट्या पॅलेस्टाईनचा भाग होता, एक म्हणजे वेस्ट बँक दुसरा पूर्व जेरूरसलेम आणि दोन्हीही भाग इस्राइलने जॉर्डन पासून १९६७ मध्ये आपल्या ताब्यात घेतले आणि गाजा पट्टी मी फक्त इजिप्त कडे होती ती सुद्धा होय. त्यामुळे या राजकारणामध्ये एक प्रकारचे वेस्ट बँक आणि जॉर्डन नदी असे आणि गाजा पट्टी यामध्ये एक प्रकारचा सँडविच झालेला इस्राइल आणि मध्य भूसागरात इथे पॅलेस्टाईनी अडकले गेले आणि वेस्ट बँक मध्ये इस्राइलने आपले मिलिटरी  कॅम्प १९८० पासूनच केले.

ईस्राइलने जेरुसलेम लॉ पास करत जेरुसलेमला  युनिफाईड असे राजधानी केली आणि त्या दृष्टीने पूर्वेचा अर्धा भाग शहराचा ज्यामध्ये जुने शहर होते आणि ज्यामध्ये अल एक्वा मस्जिद होती आणि वेलिंग वॉल तसेच चर्च होते हा भाग आपल्या भागाशी जोडला. आणि १९७० पासून लोकांच्या वस्त्या वेस्ट बँक भागात आणि पूर्व जेरुसलेम भागात त्यांना तिथे राहायला प्रोत्साहन देत जवळजवळ त्यांची संख्या सात लाख ज्यू घरे एवढी झाली. गाजा हे इस्राइलच्या ताब्यात होते आणि तिथल्या ज्यू लोकांना २००५ पर्यंत त्यांनी हमासच्या  हिंसेला तोंड द्यावे लागले आणि त्यांनी मग तो भाग हा युनिलॅटर म्हणून जाहीर केला.

सध्या पूर्व जेरुसलेम हे इस्राइलच्या ताब्यात आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात  अरबी  नागरिक आहेत आणि इस्रायली नागरिक नाही त्यामुळे आणि वेस्ट बँक हा इस्राइलींच्या सरळ वस्तीचा भाग आहे आणि पॅलेस्टाईनचा ऑथॉरिटी तिथे प्रोव्हिजनल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी १९८३ मध्ये ओस्लो एग्रीमेंट तयार झाली म्हणजे थोडासाच भाग वेस्ट बँक त्यांना देण्यात आला आणि गाजाही इस्राइलच्या ब्लॉकेड मध्ये येत होती. इस्लामिस्ट हमास यांनी गाजामध्ये २००७ पासून एक प्रकारे सेक्युलर होते. आणि त्याचा कणा होता पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ओस्लो म्हणून ओळखली जाते आणि पॅलेस्टाईन ऑथॉरिटी जी ती तयार केलेली होती. त्याशिवाय प्रमुख भाग म्हणजे २००६ मध्ये जेव्हा हमासने पार्लमेंटरी इलेक्शन मध्ये भाग घेतला, तेव्हापासून होय. परंतु या भागात कधीही शांतता नव्हती आणि पॅलेस्टाईनलिस्टने स्वतःच त्यात एकत्रित आलेले नव्हते. त्यांच्यामध्ये सुद्धा वाद झालेले दिसून येत होते. कुठला हा वादाचा मुद्दा होता तो म्हणजे द्विराष्ट्र होय आणि इस्राइल यांच्यामध्ये का विवाद निर्माण झाला याची उत्तरे मग इतिहासात शोधावी लागतात.

या हल्ल्याचा काय परिणाम होईल म्हणजे हमासने एवढा मोठ्या प्रमाणात त्याने धोका पत्करला आहे, त्याचे परिणाम अर्थातच  पॅलेस्टाईनींना आणि इस्राइलच्या नागरिकांना  भोगावे लागतील. पवित्र सणाच्या दिवशी हल्ला करून पुढे हजारो पॅलेस्टाईन नागरिकांना त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. तसेच जे हमासने आधी किंवा इस्लामिक ग्रृपने हल्ले केले होते, १९९० मध्ये आणि २००० मध्ये त्यामध्ये फारसा काही बदल झालेला दिसत नाही किंवा ते थांबलेले होते असे म्हणायला हरकत नाही. २०१७ पासून एक नवीन चाप्टर सुरू झाला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच प्रकारे त्यांनी सीझ फायर केला आहे किंवा हुंदना असा शब्द वापरला जातो. जे इस्राइलने १९६७ पासून बंद केले होते. परत एकदा  दोन्ही एकमेकांच्या नागरिकांना ऑक्टोबरचा हल्ल्याचे उत्तर इस्राइल नागरिकांना एक प्रकारे टार्गेट केले जाईल आणि त्यामधून हमासला काय साध्य होईल हे माहिती नाही. परंतु हा धोका पत्करण्यामध्ये एक महत्त्वाची बाब जी १९७३ पासून अरब देशांनी इस्राइलच्या बाबतीत सहा अरब देशांनी एक सामान्य परिस्थितीची निर्मिती झालेली दिसते आणि ते संबंध सुधारलेले हे दिसतात. फक्त आता इस्रायलला तीन गोष्टींना तोंड द्यायचे आहे. ते म्हणजे हिजबुल्लाह, हमास आणि इस्लामिक जिहाद होय. त्यामध्ये त्याचा पारंपारिक शत्रू इराण आहे. हमास आणि इस्लामिक जिहाद हे आहेत, दोन्हीही गाझा पट्टीमध्ये आहेत आणि हिजबुल्लाह आणि शिया मिलिटरी आणि राजकीय पार्टी जी लेबनानीची ती बऱ्याच प्रकारचे रॉकेट बाजूच्या शेबा फार्म्सवर जे इस्राइलने कब्जा केला आहे, त्यावर पाठवत असते यामध्ये सतत एक धुमसत राहणारा पॉईंट म्हणजे लेबनान ज्यूंचा द्वेष करतात. दक्षिण लेबनान हा होय हिजबुल्लाह हे इस्राइलशी यूद्ध करायला तयार आहेत असे म्हणतात. परंतु त्यांनी तसे समोरासमोर कधीही भाग घेतलेल्या नाही आणि इराणही सरळ सरळ तसा युद्धाची भाग घेईल असे सध्या तरी दिसत नाही. मग ह्या हल्ल्यानंतर नेत्यान्याहु जे इस्राइलचे नेते आहेत त्यांना त्यांची काय भुमिका आहे किंवा त्यांचे काय पर्याय आहेत  हा पुढचा प्रश्न आहे. त्यांनी निवडणुकीत हमासला संपवण्याचे आश्वासन दिले होते परंतु हमास इतर ट्रान्स नॅशनल आणि पेन इस्लामिक जी हिजबुल्लाह सारखी किंवा अल कायदा किंवा इस्लामिक स्टेट सारखी नसून ती एक प्रकारे स्वतः च्या हक्ढकाचे राज्य पॅलेस्टीनीना मिळावे म्हणून लढणारी संस्था आहे आणि ती पॅलेस्टाईन लोकांमध्ये लोकप्रिय आहे.

हे ही वाचा 

सुधागडच्या जवानाचा जगात डंका; बनला युनोचा शांतता सैनिक

गाझामध्ये वीज, पाण्याशिवाय कसे जगतात लोक?

हमास विरुद्ध इस्रायल युद्धात हमासची माघार? मृतांचा आकडा आला समोर

ईस्राइलची स्वतःची मिलिटरी ऑपरेशन ही बऱ्याचदा यशस्वी झालेली आहे पण या ऐतिहासिक गुंतागुंतीचे उत्तर शोधण्यात इस्राइलला स्वतःला यश आलेले नाही आणि शांती प्रस्थापित करण्यात या दृष्टीने तसेच काही स्ट्रॅटेजिक राजकीय प्रयत्नही झालेले दिसून येत नाही. लेबनान मधील जो आधीपासूनच या मिलिटरी ग्रृप आहे जो आजही पावरफुल आहे आणि इस्राइलला तो शत्रूस मानतो. त्यामुळे हा प्रश्न जो गुंतागुंतीचा आहे आणि त्याला उत्तर शोधताना दोन पॉईंट तीन मिलियन लोक आणि इस्राइल आणि पॅलेस्टाईन दोन्ही नागरिक जे आपल्या देश प्रेमाचा प्रश्न मानतात आणि आपली भूमी समजतात तसेच जेरुसलेंमसारखी जागा जिथे विविध धर्मांची उत्पत्ती झाली आणि त्यांचे पवित्र स्थळ आहे, त्यामुळे या प्रश्नात सगळे जग आणि आशिया ओढले गेले असे म्हणायला हरकत नाही.  पॅलेस्टाईनी आणि इस्राएली का भांडत आहेत. या प्रश्नाचे उत्तर इतिहासात शोधावी लागते.हे जरी खरे असले तरी ठिणगी कुणीतरी टाकलेली असते, ज्यांचा फायदा युध्द सुरू ठेवण्यातच असतो.

(लेखिका या पुणे येथील पुरातत्व इतिहास अभ्यासक आहेत.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी