25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeसंपादकीयनरेंद्र मोदींचे राजकारणातले संकटमोचक मित्र अरुण जेटली

नरेंद्र मोदींचे राजकारणातले संकटमोचक मित्र अरुण जेटली

प्राची ओले : टीम लय भारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यातील मैत्री 4 दशकांहून अधिक जुनी होती. हे बंधन केवळ राजकीय चिंतांवर अवलंबून नव्हते परंतु त्यांच्या अंतःकरणात खोलवर रुजलेले होते. राजकीय क्षेत्रातील ही दुर्मिळ मैत्री होती (Narendra Modi friend Arun Jaitley in politics).

आणीबाणी नंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अंतर्गत निलंबित नागरी स्वातंत्र्याच्या त्या दिवसांमध्ये, जेटली हे 19 महिने तुरुंगात होते तर नरेंद्र मोदी हे दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे नेते असताना, सरकारच्या बंदीचा विरोध करत होते. त्यानंतर मोदी दिल्ली विद्यापीठात बाह्य विदयार्थी म्हणून बीएच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसले होते. त्याचबरोबर जेटली यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात येथील विद्यार्थी राजकटणापासून केली, तेव्हा हे दोघे संपर्कात आले.

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका

कोलकात्याला ‘आनंदी शहर’ (सिटी ऑफ जॉय) असे का म्हणतात, जाणून घ्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर 1987 मध्ये मोदींनी भाजप मध्ये प्रवेश केला. 1989 च्या सुमारास जेटलींनी व्ही. पी. सिंग सरकारमध्ये अतिरिक्त सॉलिस्टर जनरलची जबादारी स्वीकारली. मोदी आणि जेटली पक्षाशी संबंधित बाबींव्यतिरिक्त, तासनतास पुस्तकांवर बोलत. सामाजिक समस्या आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर चर्चा करत (Discussing topics such as social issues and technology).

जेटली हे मोदींपेक्षा दोन वर्षांनी लहान असले तरी ते मोदींचे एक मार्गदर्शक होते

26 जानेवारी 2001 रोजीच्या गुजरात भूकंपानंतर केशुभाई पटेल सरकारला राज्यातील मदत आणि पुनर्वसन कार्यावर तीव्र टीका होत होती. आशा परिस्थिती   जेटलींनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांना नवे मुख्यमंत्री म्हणून मोदींचे नाव सुचवले. मोदींना मुख्यमंत्री बनवून गुजरातमधील परिस्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकते असा त्यांचा विश्वास होता. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले.

मोदी मुख्यमंत्री झाल्यावर लगेच काही काळाने गुजरात गोध्रा रेल्वे दुर्घटनेचे साक्षीदार झाले. साबरमती एक्सप्रेस कोचचा s6 डब्बा पेटला. या डब्ब्यात 59 हिंदू यात्रेकरू ठार झाले. या कारणामुळे गुजरात मध्ये आंतरजातीय दंगली घडल्या. पक्षाला हिंसाचार नियंत्रणात न ठेवण्यात अपयश आल्याचे आरोप मोदींवर झाले. त्यावेळीस देखील जेटली यांनी मोदींच्या आणि पक्षाच्या बाजूने माध्यमांनी केलेल्या आरोपांवर प्रभावी भूमिका घेत त्याचा सामना केला. त्यांच्या पक्षातील अनेक थोर मोठ्या नेत्यांनी मोदींकडून राजीनामा देखील मागितला. या सर्व प्रसंगात मोदींच्या पाठी अरुण जेटली हे कायम सोबत होते (In all these cases, Modi back was always with Arun Jaitley).

Narendra Modi friend Arun Jaitley in politics
अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री संबंध

कोरोना हृदय सम्राट गप्प का, मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

PM Modi discusses Afghan situation with Putin; Taliban make key appointments: Top developments

2013 मध्ये मोदींना पंतप्रधान पदाच्या भूमिकेसाठी उमेदवारी द्यावी अशी चर्चा सुरु झाली. तेव्हा अडवानींचा विरोध अडथळा ठरत होता. त्यावेळेस जेटली यांनी मोदींना प्रचार समितीचे अध्यक्ष घोषित केले. 13 सप्टेंबर 2013 रोजी मोदींना पंतप्रधानांचे उम्मेद्वार म्हणून घोषित केले. या कार्यात जेटलींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. अडवाणी यांनी दोन वेळा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु जेटली यांनी आपल्या मित्राचा राजकारणातील प्रवासाचा मार्ग मोकळा केला. 2014 तसेच 2019 च्या निवडणुका प्रसंगावेळी जेटली यांची तब्येत बिघडली होती, तरी देखील त्यांनी प्रचाराची जबाबदारी स्वीकारली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जेव्हा जेव्हा अडचणींचा काळ आला तेव्हा तेव्हा अरुण जेटली यांनी त्यांना मदत केली.

राजकारणातील हि मैत्री एक ऐतिहासिक गोष्ट आहे. ज्या वेळी अरुण जेटली यांनी 24 ऑगस्ट 2019 रोजी जगाचा निरोप घेतला त्यावेळी नरेंद्र मोदी अत्यंत भाऊक झाले होते. फक्त ‘माझे अरुण गेले’ अशा शब्दात दुखः व्यक्त केले. डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला होता. ह्यावरून त्यांच्या मैत्रीतली खोली अतुलनीय होती हे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी