33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयआता धास्ती बी वन वन सेव्हन ची!

आता धास्ती बी वन वन सेव्हन ची!

  • अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

सप्टेंबर 2019 आणि सप्टेंबर 2020 चा अर्थाअर्थी काही संबंध असू शकेल का ? पण तो एका घटनेबाबत कायम आहे. आणि ही घटना म्हणजे कोरोना. सप्टेंबर 2019 मध्ये चीन मधील वूहाण येथून एक अदृश्य विषाणू (corona virus) जन्माला आला आणि त्याने सर्व जगाला आपल्या कवेत घेतले. आणि तब्बल वर्षानंतर सप्टेंबर 2020 मध्ये याच विषाणू चा जुळा पण थोडा शक्तीशालो भाऊ ग्रेट ब्रिटनच्या लंडन या शहरात (B117 virus) सापडला. आणि आता तो सर्व जगाला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे या विषाणू चा आणखी एक जत्रेत हरवलेला छोटा भाऊ दक्षिण आफ्रिकेत सापडला. अगदी लॉस्ट अँड फाऊंड या मनमोहन देसाई यांच्या चित्रपटाप्रमाणे.

70 टक्के वेगाने संक्रमित होणारा हा ब्रिटिश कोरोनाने सर्वत्र दहशत माजवली आहे. अमेरिका, युरोप भारत तसेच काही आखाती देशांत यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रेट ब्रिटन बरोबर सुरु असलेली विमानसेवा भारताने रद्द करून खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरात अमेरिका आधीच्या चीन च्या कोरोना ने पूर्ण नामोहरण झाली असतानाच ब्रिटिश कोरोना ने हात पाय पसरणे सुरू केले आहे. स्पेन, पोलंड, स्वित्झर्लंड, रशिया, जॉर्डन आदी देशांनी त्यांची विमान सेवा रद्द केली आहे.

पण सर्वात मोठा कळीचा मुद्दा असा आहे की लंडन चे हिथ्रो विमानतळ हे संपूर्ण जगात कोणत्याही देशात जाण्यासाठी जक्शन म्हणून पाहिले जाते. जगभरात अनेक विमाने ही लंडन मार्गे जातात. त्यामुळे अनेक देशांना सर्वात आधी आपल्या हवाई सीमा बंद कराव्या लागतील. आणि सर्वात मोठे आव्हान हे सर्वच देशासमोर आहे.

हा नवीन कोरोना आधीच्या कोरोना पेक्षा 70 टक्के अधिक वेगाने पसरतो असे निदर्शनास आले आहे. याबाबत तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड 19 या विषाणूने आतापर्यंत 12 हजार वेळा स्वतः मध्ये जनुकीय बदल केले आहेत. जनुकीय बदल होऊन नव्याने अवतार घेतलेल्या या ब्रिटिश कोरोना ला बी वन वन सेव्हन असे नाव देण्यात आले आहे. या विषाणू ने त्याच्या स्पाईक प्रोटीन मध्ये बदल केले आहेत. आपण जे कोरोना विषाणू चे चित्र पाहतो त्यामधील काटेरी भागाला स्पाईक म्हणतात.

उपलब्ध माहिती नुसार जगभरातील तज्ञांनी 185 वेळा जनुकीय बदल केलेल्या या विषाणू चा सखोल अभ्यास केला आहे. त्यामुळे या बी वन वन सेव्हन ने नेमके कसे बदल केले आहेत याची कोणालाच माहिती नाही.

भारतासह जगभरात अनेक देशात मोठा गाजावाजा करत लस आणण्यासाठी मोठी घिसाड घाई सुरू आहे. ही लस कोरोना च्या नेमक्या कोणत्या जनुकीय बदलावर अभ्यास करून केली आहे याचे ठोस उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळे आता या तयार होत असलेल्या लस किती प्रभावी ठरणार याबाबत साशंकता आहे. जर तांत्रिक दृष्ट्या विचार केला तर या विषाणू ने आता पर्यंत 12 हजार वेळा जनुकीय बदल केले आहेत आणि तज्ञाकडून केवळ 185 वेळे पर्यन्त जनुकीय बदल झालेल्या विषाणू वर अभ्यास केला असेल तर लस कोणत्या निकषात बसणार हे कोडे आहे.

नवीन वर्ष 2021 च्या पूर्व संध्येला बी वन वन सेव्हन या नवीन अवतारीय आणि अज्ञात कोरोना विषाणू ने एन्ट्री करत 2020 प्रमाणे 2021 कसे असेल याची झलक दाखविली आहे. लस सध्या तरी लवकर येणे शक्य नाही आणि ती जर आली तर त्याचा प्रभाव किती असेल हे अगदी लस निर्मिती करणाऱ्या औषध कंपन्या सुद्धा सांगू शकणार नाहीत.

2020 च्या मार्च पासून सर्वांनीच मास्क , सोशल डिस्टन्स आणि दो गज की है जरुरी हे आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनविला आहे. 2021 मध्ये सुद्धा पूर्ण वर्षभर हेच कटाक्षाने पाळावे. कारण कोरोना हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कसून तयारी करत आहे. आपल्याकडील कोरोना योद्धे थकले पण हा कोरोना अजिबात थकलेला नाही. नवीन वर्षाच्या स्वागतात त्याला कोठे विसरू नका आणि आसपास कोठे फिरकू देऊ नका .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी