28 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeसंपादकीयQueen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थ‍िवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थ‍िवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

ब्रिटनमध्ये एका राजकीय पर्वाचा अस्त झाला. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी (Queen Elizabeth II) काल जगाचा निरोप घेतला. 96 वर्षांच्या दीर्घायुष्यात त्यांनी 70 वर्षे सत्तेचा उपभोग घेतला. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी राज्य कारभारीची सुत्रे हाती घेतली होती.

ब्रिटनमध्ये एका राजकीय पर्वाचा अस्त झाला. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी (Queen Elizabeth II) काल जगाचा निरोप घेतला. 96 वर्षांच्या दीर्घायुष्यात त्यांनी 70 वर्षे सत्तेचा उपभोग घेतला. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी राज्य कारभारीची सुत्रे हाती घेतली होती. त्यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांचे शाही राहणीमान आणि त्यांचा नेहमी आनंदी दिसणारा हसरा चेहरा हेच त्यांच्या राणी असण्याचे भूषण होते. महाराणी एलिझाबेथ दुसरी यांच्यावर वेस्टमिन्स्टर या ठिकाणी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. यावेळी लंडन आणि विंडसरमध्ये एक जुलूस निघेल. त्यावेळी संपूर्ण देशात दोन मिनीटे स्तब्धता पाळून राणीला श्रध्दांजली वाहण्यात येईल. महाराणी एलिझाबेथ दुसरी यांच्यावर राजघराण्याच्या पध्दतीनुसार शाही अंत्यसंस्कार होणार आहेत.

महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थ‍िवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये 12 दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे. एका बंदूकधारी सैन‍िकांच्या तुकडी सोबत जुलूस काढण्यात येईल. ही सर्व व्यवस्था अर्ल मार्शल करणार आहेत. राजघराण्यातील व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणे हे राज्याभिषेक करण्याचा आध‍िकार एका घराण्याकडे देण्यात आलेला आहे. वर्षांनुवर्षे ते हे काम करत आले आहेत. सुमारे 300 वर्षांपासून एक पिढी अंत्ससंस्कार करते आहे. अंत्यसंस्कारांची व्यवस्था लॉर्ड चेंबरलेनमध्ये करणार आहेत.‍ या ठिकाणी राजघराण्यातील नवव्या पिढीचा अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्ती वर्षांनुवर्षे हे काम करत आहेत.

त्यांचा परिवार 1690 पासून या ठिकाणी काम करत आहे. सर्वात प्रथम 1852 मध्ये डयुक ऑफ वेलिंग्टन यांच्यावर शाही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर राणी व्ह‍िक्टोर‍िया यांच्यावर सर्वांत शेवटी अंतिम संस्कार करण्यात आले. महाराणी व्हिटोरिया यांनी आपली अंत्यसंस्काराची इच्छा व्यक्त केली होती. माझ्यावर ‘सैनिकाच्या मुली ‘ प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात यावेत. आता अत्याधुनिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात.

हे सुद्धा वाचा

Chandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उंटाच्या पार्श्वभागाला मुका घेण्याचा प्रयत्न…

Lumpy Skin : जनावरांना ‘लम्पी’ आजाराचा धोका

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’चा सोशल मीडियावर जलवा

सीपीजे फील्डचे मॅनेजिंग डायरेक्टर जेरेमी फील्डस आहेत. अंतिम संस्काराची तयारी आचार संहितेप्रमाणे होते. ज्यामध्ये बंदूकधारी सैन्य असलेल्या एका गाडीतून जुलूस काढयात येतो. प्रिन्सेस डायना, राणीची आई, डयुक ऑफ एडिनबर्ग यांचे अंत्ससंस्कार अशाच पध्दतीने करण्यात आले होते. राजघराण्यातील एखादया व्यक्तीचे निधन झाले तर स्पेशल कॉफिन तयार केले जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी