29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
HomeमनोरंजनVikram Vedha : 'विक्रम वेधा'चा सोशल मीडियावर जलवा

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’चा सोशल मीडियावर जलवा

'विक्रम वेधा'चा ट्रेलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हृतिक-सैफ यांची भूमीका असणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘विक्रम वेधा’चा ट्रेलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हृतिक-सैफ यांची भूमीका असणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडसाठी लवकरच चांगले दिवस येतील अशी आशा यामुळे निर्माण झाली आहे. नुसता ट्रेलर पाहून प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. याचे डायलॉग, ॲक्शन तसेच या कथानकातील सस्पेन्सवर चित्रपट प्रेमींनी कमेंट केल्या आहेत. या चित्रपटात नावाजलेले अभिनेते आहेत. हृतिक रोशन, सैफ अली खान हे प्रमुख भूमीकेमध्ये आहेत. या दोघांना यात चांगली प्रसिद्धी मिळेल आशा प्रतिक्रीया नेटकरी देत आहेत. बॉक्स ऑफ‍िसवर हा चित्रपट तुफान गाजेल असा अंदाज यावरून काढला जात आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.

Vikram Vedha : 'विक्रम वेधा'चा सोशल मीडियावर जलवा

30 सप्टेंबरला हा चित्रपट पेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुष्कर आणि गायत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राधिका आपटे, रोहित सराफ, योगिता ब‍िहाणी, सत्यदीप मिश्रा, शारीब हाश्मी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमीका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर केवळ 2 मिनीटे 50 सेकंदांचा आहे. हृतिक रोशनच्या सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ पडणार आहे. या चित्रपटातले संवाद भुरळ पाडणारे आहेत. पार्श्वसंगीत खिळवून ठेवणारे आहे.

हे सुद्धा वाचा

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांसाठी भन्नाट उपक्रम!

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

Yakub Memon : याकूब मेमन प्रकरणावरून कॉंग्रेसचा भाजपवर जबराट पलटवार !

या चित्रपटात सैफ अली खान याने पोलीस अधिकाऱ्याची भूमीका निभावली आहे. हा चोर पोलिसांच्या कथेवर आधारित चित्रपट आहे. गुलशन कुमार‍, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्टमेंट, फ्रायडे फ‍िल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ, वायनॉट स्टुडिओज, प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी निश्चित हा चित्रपट धमाका उडवून देणार आहे असे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी