33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeएज्युकेशन१८० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीच्या म्युझिअमसाठी ५ कोटी रुपये ! ; जे. जे....

१८० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीच्या म्युझिअमसाठी ५ कोटी रुपये ! ; जे. जे. चा इतिहास जनतेसमोर सादर करणार

दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारती हा गॉथिक वास्तुकलेचा सुंदर अविष्कार आहे. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ यांसारख्या अनेक दिमाखदार इमारती पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. यापैकीच एक म्हणजे जे. जे. रुग्णालय परिसरातील ‘ग्रांट मेडिकल कॉलेज’. एप्रिल १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली ट्रेन धावली. त्यापूर्वीही म्हणजेच १८४३ साली ‘ग्रांट मेडिकल कॉलेज’च्या उभारणीस सुरुवात झाली आणि १८४५ मध्ये हे कॉलेज सुरु झाले. १० मार्चला या इमारतीला १८० वर्षे पूर्ण होत असून या सुंदर इमारतीचे जतन करून त्याचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी ५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या कौतुकास्पद निर्णयामुळे ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे. (5 crore rupees for the museum of ‘that’ building 180 years ago!)

‘ग्रांट मेडिकल कॉलेज’मधून शिक्षण घेतलेल्या कित्येक डॉक्टरांनी देशातच नव्हे तर जगभरात नाव कमावले आहे. हा परिसर ४६ एकरावर पसरला आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या इमारतींना हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. काही महिन्यांपूर्वीच जे. जे. रुग्णालय परिसरात ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुंबईत प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी ‘हाफकिन’ या संस्थेने याच कॉलेजमध्ये प्लेगची लास विकसित केली होती. त्यानंतर ‘हाफकिन बायोफार्म’ संस्थेत या लशीची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली. तसेच मलेरिया या आजारावरदेखील या कॉलेजमध्ये संशोधन करण्यात आले होते.

‘ग्रांट मेडिकल कॉलेज’ सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी या वस्तुसंग्रहालयाबाबत माहिती देताना सांगितले की, या वतुसंग्रहालयात अर्धाकृती पुतळे ठेवण्यात येणार असून भारतातील वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील एक दालन उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी याकरिता निधी मंजूर केल्याचे डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

  • Dr. Kotnis.jpg१९३८ साली झालेल्या दुसऱ्या महायुद्धात वैद्यकीय सेवेसाठी भारतातून पाच डॉक्टरांना चीनमध्ये पाठविण्यात आले होते. सोलापूरला १० ऑक्टोबर, १९१० रोजी जन्मलेल्या द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये समर्पित वृत्तीने जखमी सैनिकांवर वैद्यकीय उपचार केले. डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे ‘ग्रांट मेडिकल कॉलेज’चे विद्यार्थी आहेत.
    सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे डॉ. भाऊ दाजी लाड हे देखील ‘ग्रांट मेडिकल कॉलेज’चेच विद्यार्थी आहेत.
  • ‘इंडियन असोशिएशन ऑफ सर्जन’ची स्थापना करणारे डॉ. रुस्तम कपूर यांनी सुद्धा ‘ग्रांट मेडिकल कॉलेज’मधूनच शिक्षण घेतले आहे.
  • भारताची पहिली ‘मिस वर्ल्ड’ डॉ. रिटा फारिया आणि गुजरातचे पहिले मुख्यमंत्री डॉ. जीवराज मेहता यांसारख्या नामांकित व्यक्तींनी ‘ग्रांट मेडिकल कॉलेज’मधूनच शिक्षण घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

विधिमंडळाचा हक्कभंग : संजय राऊत यांचे नक्की काय चुकले ?

टॅक्सीत पॅनिक बटन लावण्यास टॅक्सी चालकांचा विरोध; वाचा नेमकं कारण

अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओव्दारे होळीच्या हटके शुभेच्छा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी