32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलीय; अजित पवारांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलीय; अजित पवारांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची गेल्या काही महिन्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान काल झालेल्या वज्रमूठ सभेत अजित पवार बोलणार का, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, अजित पवार यांनी आज आपल्या आक्रमक भाषणात शिंदे- फडणवीस सरकारवर हल्ला चढवितानाच महाविकास आघाडीत एकजूट असल्याचे सांगत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.

दगाफटका, गद्दारी करून आलेले हे सरकार (शिंदे फडणवीस सरकार) लोकांच्या मनातील सरकार नाही. घोटाळा करूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वज्रमूठ सभेत मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. महाविकास आघाडीची एकी टिकवायला हवी. त्यासाठी कार्यकर्त्यांनी दोन-तीन पावले मागे येण्याची तयारी ठेवली पाहिजे. तर, वरिष्ठांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा. जिंकून येण्याची क्षमता असणाराच महाविकास आघाडीचा उमेदवार असायला हवा, असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलीय; अजित पवारांचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक सरकार म्हटले, तरी या सरकारला ना जनाची उरली ना मनाची. मुख्यमंत्री द्रौपदी मुर्मूना पंतप्रधान म्हणतात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणाले. उद्योजकांसमोर बोलताना साडेतीन पन्नास कोटी म्हणतात, जमत नसेल तर नोट्स काढा, ते दाखवा, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. या सरकारला सत्तेवर येऊन दहा महिने झाले. पण, जनता काय करेल याचा विश्वास नसल्यानेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नसल्याचे अजित पवार म्हणाले. जनतेच्या पैशावर प्रसिद्धीसाठी वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. जनतेच्या पैशावर यांचा उदो उदो सुरू आहे. षड्यंत्राला बळी पडू नका! यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरे यांच्या काळातील खर्च आणि या सरकारच्या दहा महिन्यांतील खर्च काढा. मग कळेल की, सर्व मुख्यमंत्र्यांनी जाहिरातीवर केलेला खर्च कुठे अन् शिंदे सरकारचा खर्च कुठे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले.

दरम्यान, आपापल्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. जात, धर्म, पंथात दुरावा पाडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम शिंदे- वाचून फडणवीस सरकारचे सुरू आहे. या षड्यंत्राला बळी पडू नका, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. तसेच, न विचारता बातम्या केला जात असल्याने संभ्रम निर्माण होत असल्याचे सांगत अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याची गरज नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा:

सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटले त्याची लाज वाटत नाही; अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल आला नाही तर काय?

अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, MVA, Vajramuth Rally, Mumbai Bkc, NCP, Ajit Pawar speech at MVA Vajramuth Rally Mumbai Bkc on Eknath Shinde Devendra Fadnavis

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी