35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशनकोश्यारींनी अंबानीकडूनही देणग्या घेतल्या; निनावी पत्राद्वारे माहिती उघड

कोश्यारींनी अंबानीकडूनही देणग्या घेतल्या; निनावी पत्राद्वारे माहिती उघड

माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari)  सर्वात वादग्रस्त राज्यपाल ठरले. कोश्यारी आता पुन्हा नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil galgali) यांना मिळालेल्या निनावी पत्रात कोश्यारींच्या शिक्षण संस्थेने अनंत अंबानी यांच्याकडून 15 कोटी रुपयांची देणगी घेतल्या दावा करण्यात आला आहे. या पत्रामुळं कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी, कोश्यारी राज्यपाल असताना स्वत:च्या संस्थांसाठी घेण्यात आलेल्या देणग्यांचा तपशीलच राजभवनात नसल्याचं समोर आलं होतं. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली या संदर्भात विचारणा केली होती.

बारामतीबाबत मोठा निर्णय; अजित पवार गटाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांचा संबंध असलेल्या सरस्वती शिशू मंदिर, पिठोरगड, विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज, पिठोरगड आणि सरस्वती विहार हायर सेकंडरी, नैनिताल या शैक्षणिक संस्थेसाठी राज्यातील उद्योगपती, विकासक आणि अन्य लोकांकडून देणग्या घेतल्या होत्या. या देणग्यांची सविस्तर माहिती गलगली यांनी मागितली होती.

दिल्लीतून उदयनराजेंना ग्रीन सिग्नल? लवकरच अधिकृत घोषणा

दरम्यान, आता पुन्हा एकदा हाच मुद्दा पकडत गलगली यांनी निनावी पत्राचा दावा देत कोश्यारी यांच्यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे.

पत्रात काय म्हटले आहे?

भगतसिंग कोश्यारीसारख्या माणसाने आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंड मधील एका शाळेच्या नावाने भरपूर पैसा गोळा केला आहे. या शाळेमध्ये १०० सुद्धा मुले नाहीत अशा शाळेकरिता कोट्‌यावधीच्या देणग्या गोळा केल्या आहेत. त्या पैशातून आपला पुतण्या दीपेन्दरसिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करून तिथे रिसोर्ट चालू केले आहे.

अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी १५ कोटी रुपये घेतले आहेत. शेर सिंग कार्की सरस्वती विहार, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ उत्तराखंड देवस्थळी यांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळा केली आहे.

२०१९ पूर्वी सस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि २००९ ते २०२३ या कालावधीत किती देणग्या मिळाल्या या तुलना सहज करता येऊ शकतील. हे सांगत अकाऊंट बद्दल माहिती दिली आहे. Devbhumi Shiksha Prasar Samiti, Nainital Bank Haldwani Branch, Account No-0561000000000310 अशी माहिती आहे. याशिवाय SBI मधील एका खात्यातही अनेक व्यवहार केले गेले आहेत. असं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी