30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeएज्युकेशनJobs Updates : कौशल्य विद्यापीठात महत्वाच्या अधिकारपदांची भरती

Jobs Updates : कौशल्य विद्यापीठात महत्वाच्या अधिकारपदांची भरती

कुलसचिव, कौशल्य विभाग प्रमुख, संचालक (मूल्यनिर्धारण व मूल्यमापन), संचालक, (नवोपक्रम व नव संशोधन व उपक्रम), संचालक (समुपदेशन व पदस्थापना) या पदांची भरती विद्यापीठाने जाहीर केली आहे. त्याबाबत कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी अधिसूचना जारी केली आहे.

महाराष्ट्रात नव्याने कौशल्य विद्यापीठाची निर्मिती झाली आहे. या विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून डॉ. अपूर्वा पालकर यांची दोन महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली आहे. आता विद्यापीठाच्या कारभाराला वेग देण्यासाठी महत्वाच्या पदांवर भरती करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कुलसचिव, कौशल्य विभाग प्रमुख, संचालक (मूल्यनिर्धारण व मूल्यमापन), संचालक, (नवोपक्रम व नव संशोधन व उपक्रम), संचालक (समुपदेशन व पदस्थापना) या पदांची भरती विद्यापीठाने जाहीर केली आहे. त्याबाबत कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी अधिसूचना जारी केली आहे. ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम 2021’च्या कलम 81 मधील तरतुदीनुसार या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

याबाबत इच्छुकांनी सदर अर्ज https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर 21 सप्टेंबर 2022 संध्याकाळी 5 पर्यंत सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. याबाबत कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर  लय भारीशी बोलताना म्हणाल्या की, हे विद्यापीठ नवीन आहे. त्यामुळे संवैधानिक अधिकारी पदनिर्मितीच्या अनुषंगाने विविध पदांसाठी सध्या भरती सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात वरील महत्वाची पदे भरली जाणार आहेत. हळूहळू वर्षभरात आणखी या विविध पदांच्या भरतीबाबत आदेश काढण्यात येतील.

हे सुद्धा वाचा…

Jobs Update : सरकारी नोकरी शोधताय? मुंबई महापालिका अंतर्गत लवकरच भरती

Job Alert: BCCI सोबत काम करण्याची संधी! जाणून घ्या अधिक माहिती

Job Alert: BCCI सोबत काम करण्याची संधी! जाणून घ्या अधिक माहिती

कौशल्य विद्यापीठाअंतर्गत सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. डॉ. पालकर म्हणाल्या की, विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. एमटेक, सायबर सिक्युरीटी, रिटेल मॅनेजनेंट, पॅरामेडिकल, कृषी तंत्रज्ञान अशा अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. या अभ्यासक्रमांमध्ये डिप्लोमा, सर्टिफिकेट, अॅडव्हान्स, पदवी, मास्टर्स असे वेगवेगळे पर्याय सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत.

विद्यापीठात आता इनोव्हेशन सेलची स्थापना झाली असून याचा सुद्धा चांगलाच फायदा तरुणांना घेता येणार आहे. विद्यापीठात उपलब्ध केलेले सगळे अभ्यासक्रम हे रोजगाराभिमूख असतील. जेणेकरून शिक्षणातून मिळणाऱ्या कौशल्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना निश्चितपणे रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे, असे डॉ. अपुर्वा पालकर यांनी यावेळी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी