33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeएज्युकेशनJobs Update : सरकारी नोकरी शोधताय? मुंबई महापालिका अंतर्गत लवकरच भरती

Jobs Update : सरकारी नोकरी शोधताय? मुंबई महापालिका अंतर्गत लवकरच भरती

सध्या बेरोजगारीच्या बोंबा सगळेच मारत असले तरीही सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत सिनिअर कन्सल्टंट आणि जुनिअर कन्सल्टंट अशा विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

सरकारी नोकरी मिळणे हे अजूनही प्रतिष्ठेचे मानले जाते, त्यामुळे त्यासाठी अनेकजण सरकारी नोकरी मिळावी म्हणून खूप धडपड करत असताना दिसतात. सध्या खाजगी क्षेत्र वाढत असले तरीही त्यामध्ये स्पर्धा मोठी आहे, शिवाय त्या नोकरीवर किती वर्षे टिकणार हे सुद्धा सांगणे अवघडच त्या मुळे पर्यायाने अनेकांनी सरकारी नोकरीचाच पर्याय चांगला वाटतो. सध्या बेरोजगारीच्या बोंबा सगळेच मारत असले तरीही सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत सिनिअर कन्सल्टंट आणि जुनिअर कन्सल्टंट अशा विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. मग कसला विचार करताय?

मुंबई महापालिकेअंतर्गत सिनिअर कन्सल्टंट आणि जुनिअर कन्सल्टंट अशा विविध पदांसाठी लवकरच मोठी भरती करण्यात येणार आहे. ज्यूनिअर कन्सल्टंट पदासाठी दीड लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या व्यक्तीचे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून डीएनडी, एमडी, एमएस पुर्ण केलेले असावे तसेच सिनिअर कन्सल्टंट या पदासाठी दोन लाख रुपये पगार देण्यात येणार असून मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून डीएनडी, एमडी, एमएस सदर व्यक्तीने पुर्ण केलेले असावे.

हे सुद्धा वाचा…

Narayan Rane : शिंदे गटाबाबत नारायण राणे यांचे मोठे विधान

Ajit Pawar : नवी दिल्लीतील रूसवे – फुगवे, अजितदादांनी सांगितली खरी कारणे !

Nitin Gadkari : अक्षय कुमार यांच्या जाहिरातीवरून नितीन गडकरी ‘टार्गेट’

या वरील पदांसाठी अर्ज करण्याची 23 सप्टेंबर 2022 ही तारीख असून या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत. तळ मजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल काॅलेज बिल्डिंग, सायन, मुंबई – 400022 या पत्त्यावर सदर अर्ज उमेदवारांनी पाठवावे असे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे. या पदांसाठी वयोमर्यादा असून, ती व्यक्ती अनुभवी असणे महत्त्वाचे आहे.

सरकारी नोकरी हवी असल्यास वेगवेगळ्या परिक्षांना सामोरे जावे लागते, परंतु पगार आणि सुट्ट्यांचे समीकरण चांगले असल्याने मोठ्या प्रयत्नांनी ती अनेकजण मिळवत असतात. त्याउलट एका मुलाखतीने खाजगी मध्ये सहजच नोकरी मिळते परंतु तिथे पगार कमी असल्याने अनेकांची नाराजी होते, शिवाय किती वर्षे टिकेल याची सुद्धा शाश्वती नसते म्हणून सरकारी नोकरी म्हणजेच चांगला पर्याय म्हणून पाहिला जातो. दरम्यान मुंबई महानगरपालिकेने सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने अनेकांना यामुळे सरकारी सेवेत रुजू होता येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी