28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeएज्युकेशनप्रा. एम. एस. शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया...

प्रा. एम. एस. शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या याविषयी अधिक माहिती

शाळेपासून मुलांना विज्ञान हा विषय असतो. काही जणांना तो आवडतो तर काही जणांना त्या विषयाचा आकृती काढायला आवडतात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यपकांनी स्वत: संशोधन करायला हवे. शिक्षणासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेने ही पुरस्कार योजना 2014 पासून सुरु केली आहे. मराठी विद्या परिषदेने ‘प्रो. एम.एम. शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार’ महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांनी केलेल्या दर्जेदार संशोधनासाठी दोन पुरस्कार आहेत.

केंद्र शासनाकडून वेतन अनुदान मिळत असलेल्या शैक्षणिक संस्था वगळून महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठेतसेच महाराष्ट्र राज्यात स्थित असलेली महाविद्यालये यातील शिक्षक-गण या पुरस्कारांसाठी विचारात घेतले जातात. विद्यापीठ स्तरावर एक व महाविद्यालयीन स्तरावर एक असे दोन पुरस्कार दिले जातात. प्रत्येकी एक लाख रूपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारांचे वितरण मराठी विज्ञान परिषदेच्या अ.भा. मराठी विज्ञान अधिवेशनात केले जाते. भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रा. मन मोहन शर्मा, आय.सी.टी.,मुंबई, निवृत्त संचालक यांच्या नावे हे पुरस्कार देणार आहेत.

हे सुद्धा वाचा: 

एकनाथ शिंदे यांनी जिंकली सामान्य जनतेची मने !

सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या ओपीडीत ७० टक्के रुग्ण घटले

उदय सामंतांनी मांडले विधेयक, उद्योगवाढीसाठी खमके धोरण !

संशोधन क्षेत्र

जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पृथ्वी, वायुमंडलीय, महासागर, ग्रह, वैद्यकीय, अभियांत्रिकी, गणित आणि कृषी विज्ञान या विषयांचा समावेश असणार आहे. हे विषय त्या विषयांपुरते मर्यादित नाही.

वयोमर्यादा

विद्यापीठातील शिक्षकासाठी 50 वर्षे तर महाविद्यालयीन शिक्षकासाठी 55 वर्षे आहे. महाविद्यालयीन प्राध्यापक या पुरस्काराकरिता अर्ज करू शकतात.

अनुभव
किमान 10 वर्षे अध्यापन करणारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक हे या पुरस्काराकरिता अर्ज करू शकतात.

अर्ज

संबंधित कागदपत्रे आणि योग्य प्रकाशानांसह पूर्णपणे भरलेला अर्ज [email protected] या इमेलवर दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पाठवू शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी