27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeएज्युकेशनरोहित पवार यांनी मानले विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे आभार !

रोहित पवार यांनी मानले विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे आभार !

कर्जत-जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांची राज्य विधान मंडळाने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) सिनेटवर (Senate) नियुक्ती केली आहे. त्यानियुक्तीबद्दल आमदार रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचे तर राष्ट्रवादीने (NCP) नावाची शिफारस केल्याबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत. रोहित पवार हे राष्ट्रवादीचे तरुण पिढीतील महत्त्वाचे नेते म्हणून पुढे येत असल्याचे दिसत आहे, काही दिवसांपूर्वीच त्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. (Rohit Pawar thanked Assembly Speaker Rahul Narvekar, appointed to Savitribai Phule Pune University Senate)

तरुणांचे विविध प्रश्न सोडविणे, विद्यार्थ्यांच्या अडीअचणींना धावून जाणे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपूरावा करणे यासाठी रोहित पवार नेहमीच आघाडीवर असतात. आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे देखील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध झाली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थी वसतीगृहाचे प्रश्न देखील त्यांनी सरकारपुढे लावून धरले होते. आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याने पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.


रोहित पवार यांची सिनेटवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती केल्याबद्दल मी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरजी आणि माझ्या नावाची शिफारस केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा आभारी आहे. माझ्यावरील विश्वासाला पात्र ठरत विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन! असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपमध्ये आणखी एक पडळकर दाखल !

राज्यातील ८४६ शाळांच्या विकासासाठी पीएम श्री योजना; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

सत्यजीत तांबे यांचा नक्की इरादा काय? बाळासाहेब थोरातांच्या मनधरणीनंतर केले सुचक ट्विट

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी