33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeएज्युकेशनआता SATHEE लर्निंग प्लॅटफॉर्म देणार स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग!

आता SATHEE लर्निंग प्लॅटफॉर्म देणार स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग!

शिक्षण मंत्रालय, UGC आणि IIT कानपूर यांनी विकसित केलेले परस्परसंवादी मूल्यांकन व्यासपीठ म्हणजेच SATHEE. विशेषतः या प्लॅटफॉर्मवर परीक्षा तयारीचे साहित्य अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल आणि या व्यासपीठामुळे सर्व विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासचा अनुभव घेता येईल. सविस्तर माहितीसाठी खालील लेख वाचा... 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान विद्यापीठ अनुदान आयोगाचे SATHEE पोर्टल लाँच करणार आहेत. हे UGC, शिक्षण मंत्रालय आणि IIT कानपूर यांनी संयुक्तपणे विकसित केलेले स्वयं-गती परस्परसंवादी मूल्यांकन असे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा उद्देश समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेली दरी भरून काढणे आहे. ज्यांना प्रवेश परीक्षांचे महागडे कोचिंग परवडत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी SATHEE चे मोलाची साथ लाभणार आहे.

SATHEE प्लॅटफॉर्मवरील तयारीचे साहित्य इंग्रजी, हिंदी आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषांसारख्या अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल. विद्यार्थी NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यास साहित्याचा वापर करू शकतील. या व्यासपीठामुळे सर्व विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासचा अनुभव घेता येईल. हे व्यासपीठ UPSC भरती परीक्षा, CAT आणि GATE परीक्षांच्या इच्छुकांसाठी देखील उपयुक्त ठरेल.

आता SATHEE लर्निंग प्लॅटफॉर्म देणार स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग!

यूजीसीचे अध्यक्ष ममिदला जगदेश कुमार यांनी अलीकडेच त्यांच्या ट्विटर हँडलवर याची घोषणा केली. “विद्यार्थ्यांना संकल्पना शिकायला लावणे आणि त्यांच्या कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करणे हे SATHEE चे उद्दिष्ट आहे जेणेकरून त्यांना IIT आणि IISc फॅकल्टी सदस्यांनी तयार केलेले व्हिडिओ पाहून कोणतीही परीक्षा देण्यास आत्मविश्वास वाटेल,” असे त्यांनी ट्विट केले आहे.

SATHEE प्लॅटफॉर्म कसे काम करेल?
SATHEE वेबसाइट्स – एक JEE साठी आणि दुसरी NEET साठी आधीच तयार केली गेली आहे. या अधिकृत वेबसाइटवर असलेल्या Google फॉर्मद्वारे, उमेदवार त्यांना ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे ते निवडू शकतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. या लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये विषय-विशिष्ट फॅकल्टी आणि प्रवेश परीक्षेला कसे उत्तीर्ण करावे याबद्दल सल्ला दिला जाईल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इंग्रजी, हिंदी आणि भारतातील इतर प्रादेशिक भाषांमध्ये मुख्य साइट्सवर अभ्यास साहित्य उपलब्ध असेल.

हे सुद्धा वाचा : 

शिक्षण पद्धतींच्या अदलाबदलीमुळे ब्रिटीश भारतीयांपेक्षा साक्षर; मोहन भागवत

आधारशिवाय शालेय प्रवेशाला तात्पुरती मान्यता; शिक्षण विभागाचा निर्णय

देशविदेशातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी आले पाहिजेत : राज्यपाल कोश्यारी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी