33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराष्ट्रीयशिक्षण पद्धतींच्या अदलाबदलीमुळे ब्रिटीश भारतीयांपेक्षा साक्षर; मोहन भागवत

शिक्षण पद्धतींच्या अदलाबदलीमुळे ब्रिटीश भारतीयांपेक्षा साक्षर; मोहन भागवत

ब्रिटिशांनी लादलेल्या शिक्षण पद्धतीमुळे भारतीयांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी झाले आहे. ब्रिटीशांनी त्यांची शिक्षण पद्धती भारतात आणि आपली त्यांच्या देशात लागू केली. शिक्षण पद्धतींच्या या अदलाबदलीमुळे ब्रिटिश ७० टक्के तर भारतीय १७ टक्के शिक्षित राहिल्याचे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. ब्रिटिशांचे भारतात आगमन होण्यापूर्वी ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती. तेव्हा बेरोजगारीही कमी होती, असं मोहन भागवत म्हणाले. हरयाणातील उंड्री-कर्नाल रोडवरील रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर मोहन भागवतांनी हे विधान केले आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीवर भागवत यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली असून भारतीयांची शिक्षण पद्धती त्यांच्यापेक्षा प्रगत असल्याचे सूचित केले आहे. (British more literate than Indians due to exchange of education systems)

ते म्हणाले, “ब्रिटीश राजवटीपूर्वी देशातील ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती. तसेच, त्यावेळी बेरोजगारीही नव्हती. तेव्हा, इंग्लंडमध्ये केवळ १७ % लोक शिक्षित होती. पण, ब्रिटीशांनी त्यांची शिक्षण पद्धती भारतावर लादली आणि भारतीयांची शिक्षण पद्धती त्यांच्या देशात लागू केली. त्यामुळे ब्रिटीश ७० % आणि आम्ही १७ % शिक्षित झालो.” भारतीय शिक्षण पद्धतीचे महत्व अधोरेखित करताना मोहन भागवत म्हणाले की, “भारताची शिक्षण व्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना माफक दरात शिक्षण उपलब्ध होते. त्यामुळे शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला. या शिक्षणातून पुढे आलेले अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखले गेले.”

महागड्या शिक्षणाबाबत चिंता
देशातील महागड्या शिक्षण पद्धतीवर मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. देशात महाग होत चाललेल्या शिक्षण पद्धतीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. वैद्यकीय उपचार आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महाग होत चालल्या आहेत. सर्वांसाठी वैद्यकीय उपचार आणि शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठीच सर्वसामान्यांना माफक दारांत वैद्यकीय उपचार आणि शिक्षण मिळण्याची गरज आहे, असे महत्वपूर्ण विधान भागवत यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची पिवळी झाली होती; रामदास कदमांचा ठाकरेंना टोला

अपघातात मृत्यू पावलेल्या बिहारी मजुराच्या कुटुंबियांना समीर वानखडेंचा मदतीचा हात

आठ वर्षांची असल्यापासून वडिलांकडून लैंगिक शोषण; भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे स्पष्टीकरण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी